२२ जानेवारी प्रभु श्रीरामाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा पार्श्वभुमीवर सिध्दनाथ मंदिरातील स्वच्छता मोहिमेत आ.गोरेंचा सहभाग

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड 

                  माण – खटावचे आ. जयकुमार गोरे यांनी कार्यकर्त्यांसमावेत म्हसवड चे ग्रामदैवत असलेल्या श्री. सिध्दनाथ मंदिरात येवुन संपूर्ण मंदिराची हाती झाडु व पाण्याची पाईप घेवुन स्वच्छता केली.

                 २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे उभारण्यात आलेल्या श्रीराम मंदिरामध्ये प्रभु श्रीरामाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जात असुन, याच पार्श्वभुमीवर राज्यातील सर्व मंदिरांची साफ सफाई, स्वच्छता मोहीम भाजपच्या वतीने राबवली जात आहे. यानिमीत्त राज्यातील प्रत्येक छोट्या मोठ्या मंदिराची स्वच्छता केली जात आहे.

            २२ जानेवारी रोजी राज्यात शासकीय सुट्टी जाहिर करण्यात आली आहे. मंदिरातील स्वच्छता मोहीमेत सर्वांनी सहभागी होवुन या आनंद सोहळ्याचे साक्षीदार होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. माण – खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनीही यानिमीत्त म्हसवड येथील श्री. सिध्दनाथ मंदिरात येवुन हाती झाडु घेत संपूर्ण मंदिराची साफ सफाई केली तद्नंतर पाण्याची पाईप हाती घेत मंदिर धुवुन काढले यावेळी आ. गोरे यांना स्वच्छता करताना पाहुन अनेक म्हसवडकरांनी ही या मोहिमेत सहभागी होत जय श्रीराम चा नारा दिला.

* २२ जानेवारी  म्हसवड शहरात ठिक ठिकाणी महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!