नासप चे सातारा जिल्हाध्यक्ष व शिंपी समाजाचे धडाडीचे कार्यकर्ते इजि.सुनील पोरे यांच्या प्रेरणेतून खास नामदेव समाजोन्नती परिषद सातारा येथील सभासदांसाठी श्री संजय नेवासकर – अध्यक्ष, ना.स.प.महाराष्ट्र राज्य श्री सुनील पोरे इंजि. – अध्यक्ष जनश्री फौंडेशन म्हसवड श्री. विश्वनाथ टाळकुटे – विधिज्ञ मुंबई हायकोर्ट श्री. सुभाष भांबुरे- जेष्ठ पत्रकार दै. नवराष्ट्र यांचे सौजन्याने सातारा जिल्हा नामदेव समाजोन्नची परिषदेच्या सभासदासाठी सवलतीच्या दरात घुमान अमरतसर,वाघाबॉर्डर, वैष्णोदेवी यात्रेचे नियोजन केले आहे यासाठी सभासदानी लवकरात लवकर आपली नाव नोंदणी करण्याचे आवाहन इंजि.पोरे यांनी केले आहे
इंजि.सुनील पोरे हे नासपचे सातारा जिल्हा अध्यक्ष झाल्यापासून शिंपी समाज संघटने च्या कार्यात संपूर्ण पणे वाहून घेतले आहे सातारा जिल्ह्यातील शिंपी समाजाचे संघटन करण्यासाठी रात्रंदिवस एक करुन समाजातील मतभेद दूर करुन प्रत्येक तालुक्यातील संघटना मजबूत केली समाज एका छत्राखाली आणण्याचे महत्वपूर्ण काम इंजि.सुनील पोरे यांनी केले
त्याचाच एक भाग म्हणून सातारा जिल्ह्यातील सर्व नासप सदस्यासाठी सेवाभावी भावनेने ही सहल केवळ सातारा जिल्ह्यातील नासपचे (शिंपी समाज) सदस्यांसाठी सवलतीच्या दरात घुमान, अमरतसर,वाघा बॉर्डर,वैष्णौदेवी यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे येणाऱ्या सभासदाच्या प्रवासखर्चात प्रत्येकी १०००रु नासपचे वरील पदाधिकारी तर्फे सवलत देण्यात येणार आहे
एप्रिल २४ च्या दुसऱ्या आठवड्यात या यात्रेचे नियोजन असून प्रत्येक सभासदाचा प्रवासखर्च ७५०० रुपये आहे या खर्चात नासपचे पदाधिकारी तर्फे १००० रुपये सौजन्य रक्कम म्हणून देण्यात येणार आहे म्हणजे प्रत्येक सभासदाला ६५०० रुपये भरावे लागणार आहे मर्यादित जागा असलेने यात्रेकरीता येणाऱ्या सभासदानी १ फेब्रूवारी पर्यंत रु ३५०० माणशी प्रमाणे आगाऊ रक्कम भरून जागा निश्चित करावी असे आवाहन इंजि.सुनील पोरे यांनी केले आहे
*घुमान वैष्णोदेवी यात्रा विषयी अधिक सूचना
१)जाताना पुणे ते चंदीगड रेल्वे प्रवास व येताना जम्मु ते पुणे रेल्वे प्रवास रेल्वे… प्रवासात जेवण चहापाणी स्वखर्चाने २) रेल्वे तुन उतरले वर परत रेल्वेत बसे पर्यंत बस/छोट्या गाड्यांनी प्रवास ३) अमरतसर सुवर्ण मंदिर व घुमान संत शिरोमणी नामदेव महाराज मंदिर येथे उपलब्ध प्रसाद रुपी भोजन वगळता संपूर्ण प्रवासात हाॅटेल मध्ये चहा नाष्टा जेवण ४) आठ वर्षांचे आतील लहान बालकास ८०% शुक्ल ५)चार पांच जणांसाठी एक खोली ६) मर्यादित जागा असलेने रु ३५०० माणशी प्रमाणे रक्कम भरून जागा निश्चित करणे उर्वरित रक्कम सहल निघणे पुर्वी आठ दिवस आधी जमा करणे ७) आपल्या प्रकृती नुरुप सर्व औषधे सोबत ठेवा
नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी
इंजि श्री सुनील पोरे साहेब, अध्यक्ष. म्हसवड – 9420487411