अयोध्या दौऱ्यासाठी निघालेल्या ह भ प गंबरे गुरुजी यांचा म्हसवड चे पत्रकार अहमद मुल्ला यांचे हस्ते सत्कार

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड प्रतिनिधी

                 म्हसवड पत्रकार संघाचे वतीने ह.भ.प.गंबरे गुरुजी यांना शुभेच्छा

        हरिभक्त परायण नारायण गंबरे गुरुजी यांना अयोध्येत श्रीराम मुर्ती प्रतिष्ठापनेस निमंत्रण आले आहे.त्यांचा  म्हसवड- पत्रकार संघातर्फे पत्रकार अहमद मुल्ला याचे हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला.व शुभेच्छा देण्यात आल्या.

       माण तालुक्यातील प्रसिद्ध कीर्तनकार प्रवचनकार हरिभक्त परायण नारायण गंबरे गुरुजी अयोध्या येथे होणाऱ्या राम मंदिर मूर्ती प्रतिष्ठान साठी आज दुपारी 18 रोजी  रवाना झाले असून त्यांचा म्हसवड- येथील पत्रकार संघाचे खजिनदार पत्रकार अहमद मुल्ला यांच्या हस्ते नुकताच श्रीफळ, शाल देऊन निरोप समारंभ संपन्न झाला.

       यावेळीला म्हसवड- येथील सिद्धनाथ हायस्कूलचे ,  प्राध्यापक माने सर, सामाजिक कार्यकर्ते विनोद लोहार, ज्येष्ठ पत्रकार विजय टाकणे, यावेळी उपस्थित होते हरिभक्त परायण नारायण गंबरे  गुरुजी यांनी गेली२५ वर्ष माण  तालुक्यातील विविध भागात भागवत सांप्रदाय वाढवण्यासाठी खूप परिश्रम घेतले असून त्यांनी आजवर महाराष्ट्रातील विविध गावांमध्ये सामाजिक प्रबोधन व हरिनाम कीर्तन, सप्ताह ,ज्ञानेश्वरी पारायण , नाम सप्ताह भागवत वाचन सप्ताह ,अखंड हरिनाम सप्ताह , आयोजित केलेले आहेत. तसेच राम मंदिर उभारण्याच्या कार्यामध्ये गेली २५वर्ष ते कार्यरत आहेत.महाराष्ट्र वारकरी संघ धर्माचार्य म्हणून काम करीत आहेत.  विश्व हिंदू परिषद यांच्या माध्यमातून भागवत धर्माची पताका त्यांनी उंचावली आहे .अनेक वेळा राम मंदिर उभारण्याच्या आंदोलनामध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे.

 या कार्याच्या निमित्ताने त्यांना सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील एकमेव भागवत भक्त म्हणून श्रीराम जन्मोत्सव व अयोध्या मंदिर ट्रस्ट यांच्यातर्फे राम मंदिर मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रमासाठी दिनांक 22 जानेवारी रोजी उपस्थित राहण्याबाबत अधिकृत निमंत्रण पाठवण्यात आलेले आहे.

 या निमंत्रणाचा स्वीकार करून ते आज पंढरपूर येथून प्रयागराज येथे जाणार आहेत व तेथून अयोध्या येथे होणाऱ्या मूर्ती प्रतिष्ठापना समारंभासाठी उपस्थित राहणार आहेत . त्यांना शुभेच्छा देण्यासाठी म्हसवड- परिसरातील भक्तांनी गर्दी केली होती.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!