वेणूताई चव्हाण कॉलेज, कराडमध्ये विद्यार्थी व्यापार मेळावा संपन्न
व्हिजन २४ तास न्युज (संपादक:अहमद मुल्ला )
कुलदीप मोहिते
कराड :(, प्रतिनिधी)
श्री शिवाजी शिक्षण संस्था, कराडच्या उच्च शिक्षण मंडळ कराडचे वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड येथे विद्यार्थी – व्यापार मेळावा ( Trade Fair 2024) चे आयोजन मकर संक्रांतीला सोमवार, दि. 15 जानेवारी 2024 रोजी सकाळी 8 ते 1 या वेळेत करण्यात आले. “एक पाउल उद्योजकतेकडे’ हे ब्रीद घेऊन विद्यार्थ्यामध्ये व्यापार कौशल्य विकसित व्हावे व त्यांनी व्यवहार ज्ञान समजून घ्यावे हे ध्येय ठेवून सदर व्यापार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या व्यापार मेळाव्याचे उदघाटन यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, कराडचे प्राचार्य डॉ. सूर्यकांत केंगार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे जनरल सेक्रेटरी अल्ताफहुसेन नसरुद्दीन मुल्ला साहेब व संस्थेचे विश्वस्त व सदस्य . अरुण पाटील (काका) उपस्थित होते. त्यांनी सर्व स्टॉलला भेटी देऊन विद्यार्थांचे कौतुक करून प्रोत्साहन दिले.


