अभय दादा जगताप प्रीमियर लीग या स्पर्धेत शिवक्रांती स्पोर्ट क्लबचा अंतिम सामन्यात एक लाखांचे पारितोषिकासाठी विजय

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )

म्हसवड

         शरद क्रीडा महोत्सव अंतर्गत अभय दादा जगताप प्रीमियर लीग या स्पर्धेत बोरगाव संघाचा एकतर्फी पराभव करत शिवक्रांती स्पोर्ट क्लबने अंतिम सामन्यात एक लाखांचे पारितोषिकासाठी विजय मिळवला आहे. सदरच्या स्पर्धा गाव तसेच तालुका संघा दरम्यान खेळवण्यात आल्या होत्या. या मालिकेत २४ संघानी सहभाग नोंदवला. यामध्ये दहिगाव व शिवक्रांती यांच्यातील उपांत्य फेरीतील सामना रोमांचक ठरला .

                     यावेळी यावेळी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस अभयसिंह जगताप,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे विद्या विकास महामंडळाचे सचिव विलास भुमरे शिवसेना शहराध्यक्ष संजय शिंदे मनसे तालुकाध्यक्ष संजय घोलप शिवसेना गटनेते प्रवीण कटारिया काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रताप जगताप वंचित बहुजन आघाडी जिल्हा युवक अध्यक्ष साहेबा वाघमारे विशाल लोंढे नगरसेवक अल्ताफ तांबोळी माजी नगराध्यक्ष शौकत भाई नालबंद माजी बांधकाम सभापती अतुल भाई फंड प्रशांत डहाळे सचिन गायकवाड मकाई कारखान्याचे संचालक अमोल दादा यादव विजय लावंड राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अरुण काका जगताप राष्ट्रवादी शहर युवक अध्यक्ष अमीर तांबोळी समाधान शिंगटे सचिन नलवडे रवी घाडगे इरशान पठाण व शिव क्रांती टीमचे सर्वेसर्वा विनय काका ननावरे, माण तालुका मार्केट कमिटीचे माजी संचालक विजय जगताप माण काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय जगताप  दहिवडी चे नगरसेवक महेश राव जाधव, सुरेंद्र मोरे विलास खरात अंकुश गाढवे किरण खळवे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष राजू मुळीक ऋषिकेश जगताप सतीश जगताप दिलीप शेठ वीरकर सुनिकेत जगताप मारुती मदने दिगंबर जगताप सुभाष जगताप सुरेश घाडगे नानासाहेब जगताप उत्तम जगताप आप्पा सूर्यवंशी भागवत पिसे यशवंत जगताप रामभाऊ शिंदे शशिकांत कोठावळे राहुल कोठावळे धर्मराज कोठावळे सोनू केंगार आबा चव्हाण यादव सर यासह अभयसिंह जगताप युवा मंच माढा चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

          स्पर्धेत आनंद भांगे व नितीन चोपडे यांनी सुत्र संचालन केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विनय ननवरे, सतिष फंड, भारत जगताप, अमर शिंगाडे, अझर जमादार, उमेश फंड, शशिकांत देहटे, विश्वजीत परदेशी यांच्यासह शिवक्रांती संघाच्या खेळाडुंनी प्रयत्न केले. 

                      राष्ट्रवादीचे नेते अभयसिंह जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भरवण्यात आलेल्या पाच दिवसीय सामन्यात अंतिम सामना हा प्रकाश झोतात खेळवण्यात आला. यावेळी बऱ्याच दिवसानंतर रात्रीचे सामने होत असल्याने प्रेक्षकांमध्ये नवा उत्साह होता. तर गाव पद्धतीच्या संघातून बोरगाव विरुद्ध केम व तालुका पद्धती मधून शिवक्रांतीविरुद्ध दहिगाव असे  उपांत्य फेरीतील सामने झाले. यामध्ये बोरगाव ने केम चा तर शिवक्रांतीने दहिगाव चा पराभव करीत अंतिम फेरी गाठली.

        अंतिम सामना बोरगाव विरुद्ध शिवक्रांती असा खेळण्यात आला. त्यामध्ये शिवक्रांती संघाच्या सुरज गुप्ता ३३ (१२), विलास दाहितोंडे २७(८), मिलिंद दामोदरे २८(६) यांच्या खेळीच्या जोरावर पाच बाद १२६ पर्यत मजल मारली. तर स्पर्धक संघ केवळ ६८ धावांपर्यत पोहचु शकला. यास्पर्धेत शिवक्रांती प्रथम, बोरगाव द्वितीय, दहिगाव तृतीय, केम चतुर्थ तसेच उंदरगाव व पोथरे यांना प्रत्येकी १० हजाराचे उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेत  मालिकावीर म्हणुन अमोल कासार, सामनावीर मिलिंद दामोदरे (शिवक्रांती), उत्कृष्ट गोलंदाज सचिन निंबाळकर (दहिगाव) व उत्कृष्ट फलंदाज म्हणून अनिकेत नगरे यांना गौरवण्यात आले. या क्रिकेट स्पर्धांचे आयोजन शिवक्रांती स्पोर्टकडुन करण्यात आले होते. 

चौकट: अभयसिंह जगताप माढा प्रीमियर लीग व खेळ पैठणीच्या माध्यमातून तसेच संपूर्ण माढा मतदारसंघात आगामी लोकसभेच्या अनुषंगाने विविध इव्हेंट, गाठी भेटीच्या माध्यमातून  अभय सिंह जगताप हे पदाधिकारी,मतदारांच्या गाठी भेटी घेत आहेत.  राष्ट्रवादी कडून अधिकृत उमेदवार म्हणून त्यांना पसंदी मिळताना दिसत आहे. एक निष्कलंक नेतृत्व म्हणून त्यांनी माढा मतदारसंघात धुरळा उठवला आहे


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!