सर्वांगीण दृष्ट्या यशस्वी होण्यासाठी जीवनात उच्च ध्येय ठेवा : एन. शेषागिरी राव
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड ..प्रतिनिधी
सर्वांगीण दृष्ट्या यशस्वी होण्यासाठी जीवनात उच्च ध्येय ठेवा असे आवाहन सद्गुरु श्री श्री साखर कारखाना राजेवाडी चे चेअरमन एन. शेषागिरी राव यांनी म्हसवड येथे केले.
कृषि विकास प्रतिष्ठान संचलित क्रांतिवीर इंग्लिश मिडियम सीबीएसई स्कूल म्हसवड येथे वार्षिक पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला होता.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वभर बाबर होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून राजेवाडी येथील सद्गुरु श्री श्री साखर कारखान्याचे चेअरमन एन.शेषा गिरी राव यांचे सह संस्था सचिव मुख्याध्यापिका सुलोचना बाबर प्राचार्य राहुल फुटाणे, शिक्षक, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना शेषागिरी राव म्हणाले शालेय जीवन हेच विद्यार्थ्यांच्या यशस्वी जीवनाला आकार देण्याचा योग्य कालावधी आहे. विद्यार्थ्यांनो या शिक्षण संस्थेने तुम्हाला खूप काही देऊ केले आहे.
जीवनात उच्च ध्येय ठेवा आणि स्वतःची एक चांगली ओळख निर्माण करण्यासाठी कष्टाला पर्याय नसल्याचेही राव यांनी स्पष्ट केले. शालेय जीवनात मोबाईल, टीव्ही पासून शक्यतो दूर राहा किंवा त्याचा वापर फक्त चांगले ज्ञान आत्मसात करण्यासाठी करा.जीवनात कौशल्य युक्त शिक्षण महत्त्वाचे असून त्यासाठी प्रयत्न करा.महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे.आपले आचार विचार चांगले ठेवा. गुरुजन व आई-वडिलांचा सन्मान ठेवण्याचे आवाहन राव यांनी केले.
पुढे बोलताना चेअरमन राव म्हणाले सर्वांनाच नोकरी मिळणे शक्य नसल्याने उद्योग व्यवसाय इत्यादींनी युक्त
शिक्षणाच्या दृष्टीने विचार करा. अभ्यासाबरोबरच खेळाला सुद्धा महत्त्व द्या .भारतरत्न सचिन तेंडुलकर
लता मंगेशकर इत्यादी मान्यवरा कडून प्रेरणा घेऊनअभ्यासाबरोबरच कला क्रीडा क्षेत्रात सक्रिय राहण्याचे आवाहन केले.क्रांतीवीर शैक्षणिक संकुल एक उपक्रमशील संकुल असून या संकुलास उज्वल भविष्य असल्याचे राव यांनी स्पष्ट केले.

यावेळी बोलताना संस्थापक कृषिरत्न विश्वंभर बाबर म्हणाले अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून चेअरमन शेषागिरी राव यांचा आम्हाला रस्ता अभिमान असून त्यांनी केलेली मदत आम्ही कधीही विसरणार नाही.सहकार ,उद्योग, व्यवसाय,गोरक्षण, नैसर्गिक शेती व अध्यात्मिक क्षेत्रात राव यांचे कार्य महत्त्वपूर्ण असल्याचे प्रा. बाबर यांनी तपशीलवारपणे सांगितले.प्राचार्य राहुल फुटाणे यांनी प्रास्ताविक करून
क्रांतिवीर इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूल म्हसवड मधील उपक्रमाची माहिती दिली. या निमित्ताने विविध खेळ प्रकारा मधील गुणवंत खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते मेडल व ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका पल्लवी जगताप व वानीश्री सावंत यांनी तर उपस्थिताचे आभार अमोल खुस्पे यांनी व्यक्त केले.