माजी नगराध्यक्ष अजितराव राजेमाने यांच्या हस्ते राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड –
येथील ग्रामदैवत श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी यांच्या रथोत्सवानिमित्त रिंगावन यात्रा भरली असून यात्रेनिमित्त प्रथमच राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन येथील बाजारपटांगण येथे भरवण्यात आले असून या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन म्हसवडचे राजे माजी नगराध्यक्ष अजितराव राजेमाने यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माजी नगराध्यक्ष विलासराव माने, सुरेश म्हेत्रे, तेजसिंह राजेमाने, दिपसिंह राजेमाने, प्रतापसिंह राजेमाने, गणपतराव राजेमाने, युवराज सुर्यवंशी,प्रा.विश्वंभर बाबर बाबासाहेब माने विठ्ठल काटकर सर,विकास गोंजारी ,मुख्याधिकारी डॉ सचिन माने,किशोर सोनवणे,परेश व्होरा,राहुल मंगरुळे,शांताराम माने अॅड.निसार काझी आकाश राजेमाने बाळासाहेब माने,आदी मान्यवर उपस्थित होते
शेतकरीवर्गालाही फायदा व्हावा याचाच विचार करून यंदा श्री. सिध्दनाथ यात्रेत प्रथमच राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन भरवले असल्याचेही राजेमाने यांनी सागितले.माण हा कायम दुष्काळी तालुका म्हणुनओळखला जातो याच दुष्काळी मातीत शेतकरी आपल्या मेहनतीवर सोनं
पिकवण्याची किमया करीत आला आहे, या शेतकर्यांना आधुनिक शेती व शेतीतील बदल, हवामान, औजारे खते, बी-बियाणे याची चांगली माहिती मिळाली तर त्याचा त्यांना नक्कीच चांगला फायदा होईल हाच उद्देश ठेवुन सदर कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. सदरचे कृषीप्रदर्शन हे 12 डिसेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत सर्वांना पाहण्यासाठी खुले करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये आरोग्यविभाग, कृषि विभाग, पशुवैद्यकिय विभाग,व जिल्हा बँक आदींचे महत्वाचे स्टॉल लावण्यात आली आहेत याद्वारे शेतकर्यांना विविध प्रकारची माहिती संकलित करता येणार आहे. तर याव्यतिरीक्त विविधप्रकारची औजारे, खते, बी-बियाणे, ट्रॅक्टर, आदींसह खाद्यपदार्थांचीही स्टॉल लावली आहेत प्रदर्शन पाहण्याठी नागरीकांची मोठी गर्दी केली असून हे प्रदर्शन चार दिवस चालणार आहे