म्हसवड नदीपात्रातील बेकायदेशिर बांधलेल्या बंधारा मालकावर कायदेशिर कारवाई व्हावी या साठी अजिनाथ केवटे यांचे आमरण उपोषण

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )

म्हसवड

म्हसवड मधील यात्रा पटांगणाजवळ माणदेशी फौंडेशनने नदीपात्रात शहरालगत बेकायदेशीर बांधलेल्या बंधा-याबाबत  ११ दिवस बेमुदत अंदोलन करून सुध्दा या बंधा-या मालकावर कोणतीही कारवाई केली गेली नाही या आंदलनावेळी मा. उपविभागीय अधिकारी माण (दहिवडी) यांनी नुसते लेखी आश्वासन दिले होते की बंधाऱ्याबाबत २० नोव्हेबर पर्यंत निर्णय घेणार असे सांगीतले होते त्यामुळे ते उपोषण मागे घेतले होते

पण अद्याप त्याबाबत त्यांनी कोणताही निर्णय घेतला नाही . हया बंधा-यात ३ जणाना बुडुन जीव गमवावे लागले आहेत. हा बंधारा काढून या बंधारा मालकावर मनुष्यवधाचा गुन्हा तसेच बेकायदेशीर बंधारा बांधल्याबाबत कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी  अजिनाथ लक्ष्मण केवटे, (अध्यक्ष – रिपब्लिकन सेना माण तालुका) रा. म्हसवड, ता. माण जि. सातारा हे दिनांक ०८/१२/२०२३ पासुन बेमुदत आमरण उपोषणाला बसले आहेत उपोषणाचा आज चौथा दिवस असून अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे अजिनाथ केवटे यांनी सांगीतले


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!