उपलब्ध शैक्षणिक सुविधे मधील संधीचं सोनं करा :शहाजी डोंगरे
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड ….प्रतिनिधी
क्रांतिवीर शैक्षणिक संकुल एक उपक्रमशील शैक्षणिक संकुल असून
उपलब्ध शैक्षणिक सुविधे मधील संधीचं सोनं करा असे आवाहन रयत शिक्षण संस्थेचे माजी ऑडिटर प्राचार्य शहाजी डोंगरे यांनी म्हसवड येथे केले.
क्रांतीवीर शैक्षणिक संकुल म्हसवड अंतर्गत च्या क्रांतिवीर ज्युनिअर कॉलेज येथे प्राचार्य शहाजी डोंगरे यांनी सदिच्छा भेट दिली.यावेळी संस्था अध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर , प्रा. गुलाबराव खाडे, बाळासाहेब काटकर, बापूसाहेब डोंगरे उपस्थित होते
यावेळी बोलताना प्राचार्य शहाजी डोंगरे म्हणाले म्हणाले आजचे जग हे स्पर्धेचे जग असून कष्ट करणाऱ्यालाच यशाच्या शिखरापर्यंत पोहोचता येणार आहे. विद्यार्थ्यांनो संस्था व शाळेच्या माध्यमातून तुम्हाला खूप काही शैक्षणिक सुविधा देऊ केलेल्या असून संधीचं सोनं करण्याचं काम तुमच्या हातात आहे.नियमित अभ्यास करा ,जिद्द चिकाटी ठेवा.अवांतर वाचनाची आवड ठेवा.
थोरामोठ्याकडून प्रेरणा घ्या.अभ्यासाबरोबर खेळाकडे लक्ष द्या.वक्तशीरपणा व नियोजन केल्यास काहीही अवघड नसल्याचे प्राचार्य डोंगरे यांनी स्पष्ट केले.क्रांतिवीर शैक्षणिक संकुल हे खूप संघर्षातून उभे केलेले असून कर्मवीर भाऊराव पाटील यांचा वसा आणि वारसा संस्थाध्यक्ष विश्वंभर बाबर व सुलोचना बाबर यांनी या ठिकाणी जोपासल्याने या संकुलाला उज्वल भविष्य असल्याचे त्यानी स्पष्ट केले. क्रांतिवीर शैक्षणिक संकुल स्थापनेचा मी साक्षीदार असून खूप कष्ट व त्यागातून हे संकुल उभे राहिलेले असल्याने विद्यार्थ्यानेा येथील शैक्षणिक सोयी सुविधा लाभ घेऊन स्वतःचं कर्तुत्व निर्माण करा .रयत सेवक तसेच अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून विश्वंभर बाबर यांचा मला सार्थ अभिमान असल्याचे सांगून कृषिरत्न बाबर सर व माझे जुने ऋणानुबंधअसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. क्रांतिवीर संकुलातील सन्मान हा माझ्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असल्याचे डोंगरे यांनी सांगितले.
पुढे बोलताना प्राचार्य डोंगरे म्हणाले जीवनात यशाच्या सर्वोच्च ठिकाणी पोहोचायचं असेल तर शालेय जीवनापासूनच दक्ष राहा.परिस्थितीवर मात करून संधीचं सोनं करा.अभ्यास करून स्वतःची ओळख निर्माण करा. विद्यार्थी मित्रांनो तुमच्या पेक्षा वाईट परिस्थितीतून आम्ही पुढे आलेलो आहे. या निमित्ताने गुरुजन व आई-वडिलांच्या कष्टाची जाण ठेवून कार्यरत राहण्याचे आवाहन प्राचार्य डोंगरे यांनी केले.प्रा.गुलाबराव खाडे यांनी आपले मनोगत व्यक्त करून विश्वंभर बाबर यांच्या अष्टपैलू कार्याचा आपल्याला रास्ता अभिमान असल्याचे सांगितले.
संस्थाध्यक्ष प्रा. विश्वंभर बाबर यांनी क्रांतिवीर शैक्षणिक संकुला अंतर्गत सुरू असणाऱ्या शैक्षणिक शाखा व उपक्रमाची माहिती मान्यवरांना दिली.प्रास्ताविक प्राचार्य विठ्ठल लवटे यांनी केले .कार्यक्रमासाठी संकुलातील सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते