वरकुटे-म्हसवड गावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : सोनिया गोरे
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
दिपक काटकर (प्रतिनिधी)
वरकुटे-म्हसवड :
मोटेवाडी येथे सभामंडप कामाचे उद्घाटन आमदार जयकुमार गोरे यांच्या सुविद्य पत्नी सौ.सोनिया गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. गावाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे प्रतिपादन सोनिया गोरे यांनी केले.
मोटेवाडी येथिल गजी मंडळाने आमदार जयकुमार गोरे यांच्या कडे सभामंडपाची मागणी केली त्या नुसार आ.गोरे यांनी सभामंडप कामासाठी १० लाखचा निधी उपलब्ध करून दिला.

सभामंडप कामाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना सोनिया गोरे म्हणाल्या की, भाऊंच्या माध्यमातून वरकुटे-म्हसवड गावामध्ये अनेक कामे झाली आहेत तर काही कामांना मंजुरी मिळाली आहे. ती ही कामे लवकरच सुरू होतील. या भागातील जिहे-कठापुर योजनेचे काम सुरू आहे ते पाणी लवकरच मिळणार आहे.
यावेळी बोलताना काकासाहेब माने म्हणाले की, आमदार जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून वरकुटे-म्हसवड गावामध्ये अनेक विकासकामे झाली आहेत आपण सर्वांनी भाऊंच्या पाठीशी राहू या व गावचा सर्वांगीण विकास साधुया. यावेळी सुभाष माने, अमोल माने, अशोक गोरड, पांडुरंग माने फौजी, धनाजी माने फौजी, सुनील माने, रंगनाथ मोटे, नितीन मोटे, अजित माने, पोपट माने, गणेश माने, पंकज शिलवंत, मोटेवाडी व वरकुटे येथिल महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाकीचे माजी उपसरपंच रघुनाथ माने यांनी उपस्थितांचे आभार मानले.