म्हसवड येथील अरिहंत सुपर मार्केट बझाराचे शटरचे सेंटर लॉक तोडून २४ हजार ३०० रु किमतीचा माल व रोख रक्कमेची चोरी करून अज्ञात चोरटे पसार

बातमी Share करा:

  व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड
                 येथील   होलसेल व रिटेल किराणा मालाचे प्रसिद्ध  व्यापारी  ईशांत रमेश मोडासे  यांचे सहकार नगर  कॉलनीमध्ये पोलीस स्टेशन रोडच्या  मुख्य रस्त्यावर असलेल्या अरिहंत सुपर मार्केट बझार मध्ये शुक्रवार दि २४ रोजी रात्री  घरातील सर्व जन दुकानाच्या वरच्या मजल्यावर  झोपी गेल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे मागील बाजूने शटरचे सेंटर लॉक उचकुटुन २४ हजार ३०० रु. किंमतीचा माल व रोख रक्कम चोरुन नेहली म्हणून म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
या बाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी
 दिनांक २४/११/२०२३ रोजीचे रात्री ८.१५ वा. ते दिनांक २५/११/२०२३ रोजीचे सकाळी ६.०० वा. चे दरम्यान  सहकार नगर  कॉलनी म्हसवड येथील अरिहंत सुपर मार्केट बझाराचे पाठीमागील दरवाजाचे कोणीतरी अज्ञात चोरट्यांने शटरचे सेंटर लॉक उचकुटुन आत प्रवेश करून गल्ल्यातील १५ हजाराची रोख रक्कम ,५ हजार रु .किमतीचे सीपी प्लस कंपनीचा डीव्हीआर बॉक्स व एम.आय कंपनीचा वायफाय राऊटर,१ हजार ५०० रु. किमतीचे  ५ किलो वजनाचे खारीक  अशी  एकूण   २४ हजार ३०० रु. किंमतीचा माल व रोख रक्कम घरफोडी  करुन चोरुन नेहला असल्याची फिर्याद ईशांत रमेश मोडासे यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात दिली म्हसवड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास सपोनि राजकुमार भुजबळ करत आहेत

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!