राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेसाठी उत्कर्षा उणउणे ची निवड.

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला)
म्हसवड.. प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालया तर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेतून उत्कर्षा सचिन उणउणे हिची राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
उत्कर्षा उणउणे ही क्रांतिवीर इंग्लिश मीडियम स्कूल सी.बी.एस.ई.म्हसवडची विद्यार्थिनी असून या निमित्ताने तिने शाळेचे नाव उज्वल केले आहे.
केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयातर्फे शालेय स्तरावरील राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन मुंबई येथे केले होते.या स्पर्धेत राज्यभरातील हजारो स्पर्धक सहभागी झाले होते.इयत्ता आठवी ते दहावी या शालेय वयोगटातून उत्कर्षा सचिन उणउणे हिने राष्ट्रीय स्तरावर भरारी घेऊन उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
या वयोगटातील केवळ 50 स्पर्धकांची निवड राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली असून या स्पर्धा सुद्धा मुंबई येथे होणार आहेत. कृषी विकास प्रतिष्ठानचे संस्थापक कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर, सचिव मुख्याध्यापिका सुलोचना बाबर, क्रांतिवीर इंग्लिश मीडियम शाळेचे प्राचार्य राहुल फुटाणे यांनी उत्कर्षाचा यथोचित सत्कार केला.यावेळी माजी प्राचार्य प्रभाकर उणउणे, सचिन उणउणे,भाग्यश्री उणउणे तसेच उणउणे कुटुंबीय उपस्थित होते.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!