म्हसवड मधिल बंद घराचे कुलुप तोडून अज्ञात चोरट्यानी ४४ हजार रुपयाचा माल लंपास केला
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक;अहमद मुल्ला )
म्हसवड
अज्ञात चोरट्यांनी म्हसवड शहरातील विश्रामगृहच्या पाठीमागे रहात असलेल्या शिवाजी बापु कोळेकर (वकील ) यांच्या बंद घराला टार्गेट करीत घराच्या दरवाजाचे कुलूप तोडुन घरातील सोन्या-चांदीच्या ऐवजावर डल्ला मारीत सुमारे ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपाल केला असुन ऐन दिवाळीत चोरट्यांनी घरफोडी केल्याने म्हसवडकरांमध्ये कमालीची दहशत निर्माण झाली आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी म्हसवड येथील विश्रामगृहाच्या पाठीमागे धुळदेव येथील वकील शिवाजी बापु कोळेकर हे आपली पत्नी व मुलीसह रहावयास आहेत, ते याठिकाणी राहुन येथील न्यायालयात आपला वकीली व्यावसाय करतात, तर त्यांचे मुळगाव असलेल्या धुळदेव याठिकाणी त्यांचे आई- वडील व भाऊ असे एकत्रित राहुन शेती करतात तर अँड कोळेकर हे सुध्दा वरचेवर गावी जावुन शेती पाहतात. दि. ९ रोजी धुळदेव येथे त्यांचा रहात असलेल्या पुतण्याच्या मुलीच्या बारशाचा कार्यक्रम असल्याने ते आपली पत्नी व मुलीला सोबत घेवुन आपल्या गावी धुळदेव येथे गेले होते,तेथेच पुतण्याच्या मुलीचे बारसेचा कार्यक्रम रात्रौ ८.३० वाजता बारसेच्या कार्यक्रम झाला व जेवनखान करुन तेथेच मुक्कामी थांबवले होते. दिनांक १० /११ २०२३ रोजी रात्रौ ३.०० वा. चे सुमारास कोळेकर यांचे शेजारी असणारे सुळे ग्रामसेवक यांनी फोनवरून कळविले की, अज्ञात चोरट्यांनी तुमचे घर फोडलेले आहे अशी माहिती फोनवरून समजताच लगेच तेथुन फोरव्हीलर गाडीने कोळेकर व त्यांची पत्नी म्हसवड येथे रेस्ट हॉऊस पाठीमागे असलेल्या घरी आले. त्यावेळी त्या ठिकाणी पोलीस स्टाफ घरासमोर थांबलेले होते. त्यानंतर कोळेकर यांनी घरात जावुन घरात ठेवलेले कपाट पाहीले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराला लावलेले कुलुप तोडुन घरातील कपाटात असलेले दिड तोळ्याचे सोन्याचे मिनी गंठण किंमत (४० हजार) रुपये तर चांदीचे पैंजण जोडी किंमत (४ हजार रुपये) असा एकुण ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला असल्याचे दिसून आले याबाबतची फिर्याद अँड कोळेकर यांनी म्हसवड पोलीसांत दिली असुन सदर फिर्यादीवरून म्हसवड पोलीसांनी घरातील कपाटाची तपासणी केली असता कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त फेकलेल्या अवस्थेत मिळुन आले सदरचा प्रकार हा चोरीचा असल्याने पोलीसांनी अँड. कोळेकर यांच्या तक्रारीवरून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सपोनि राजकुमार भुजबल करत आहेत.