म्हसवड पोलीसांची कारवाई: ५३हजार ७००रुपए किमतीच्या गुटख्यासह १ लाख २८ हजार ७००रुपए किमतीचा मुद्देमाल जप्त 

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड(संपादक:अहमद मुल्ला )
 म्हसवड,:
स्कुटरवर  दिघंची येथून म्हसवड येथे बेकायदेशीरपणे विक्रीसाठी गुटखा घेऊन येत असताना  पोलिसांनी आज सकाळी पकडला या प्रकरणी अरिफ ताजुद्दीन तांबोळी (वय 42 ) रा.म्हसवड यास पोलिसांनी ताब्यात घेतले असुन त्याचे जवळ सापडलेला  53 हजार 700 रुपये किमतीच्या गुटक्यासह एकूण एक लाख 28 हजार 700 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
म्हसवड पोलिस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद झाली आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितलेली माहीती अशी की, आज सकाळी साडे नऊच्या सुमारास म्हसवड गावचे हद्दीत म्हसवड ते आटपाडी जाणारे रस्त्यावर म्हसवड येथील स्मशान भुमीजवळ अरिफ ताजुद्दीन तांबोळी हा विक्रीसाठी दिघंचीहून गुटखा घेऊन येणार असल्याची खबर मिळाली होती.
या माहीतीच्या आधारे म्हसवड आटपाडी रसत्यावर सापळा रचून बसलेल्या पोलिसांना अरिफ तांबोळी हा लाल रंगाच्या स्कूटरवर ( एमएच 11 सी.व्ही 3349) तीन पोती भरलेली गुटखा विड्याची बंडले सापडली. पोलिसांनी तीन पोती गुटखासह स्कूटर ताब्यात घेऊन हा ऐवज जप्त केला व  अरिफ तांबोळी  वय 42 वर्षे रा. म्हसवड ता. माण जि. सातारा याचे विरूद्ध     सरकारतर्फे  भादविस कलम 328,188,273,272 अन्न सुरक्षा आणी मानके अधिनीयम कलम 27 (3) (e), 30(2), 26 (2) (i), 26 (2) (vi) अन्न भेसळ प्रतिबंधक (महाराष्टार सुधारणा) अधिनीयम कलम 3 प्रमाणे  म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला  आहे  पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ शिरकुळे व पोलीस कॉन्स्टेबल वाघमोडे यांनी ही कारवाई केली

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!