वडजल ता माण येथे संतप्त सकल मराठा समाज बंधू भगिनींचे साखळी उपोषण सुरू : संपूर्ण गावातून कॅन्डल मार्च काढून शासनाचा निषेध

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
पोपट बनसोडे
म्हसवड: प्रतिनिधी
वडजल मध्ये सकल मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी 40 दिवसाची वेळ दिली होती.ती संपून  आज आठ दिवस झाले क्रांतीसुर्य मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले असून गेंड्याची कातडी पांगरलेल्या सरकारने अजूनही याबाबत तोडगा काढलेला नसल्याने संतप्त सकल मराठा समाज बंधू भगिनींनी साखळी उपोषण सुरू केली असून संपूर्ण गावातून कॅन्डल मार्च काढून शासनाचा निषेध व्यक्त केला आहे. 
          संपुर्ण महाराष्ट्रात मनोज जरांगे- पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा मिळत आहे वडजल येथे ” एक मराठा लाख मराठा , आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच , जय भवानी जय शिवाजी, अशा घोषणा देत वडजल मध्ये वडजाईदेवीच्या मंदीरा पासून जांभूळबेट रोड ते एस.टी.स्टॅन्ड ते गावातून कॅन्डल मार्च काढण्यात आला.या मध्ये मोठ्या संख्येने महिला आबालवृद्ध शाळकरी मुले मुली व सर्व धर्मिय लोक सहभागी झाले होते. तसेच मराठा आरक्षणाला होत असलेल्या विलंबाचा निषेध म्हणून साखळी उपोषणा सुरू करून संपुर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली  होती
          महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या जिल्हयातच १८८१ झालेल्या जातनिहाय जनगणनेनुसार प्रसिद्ध गॅझेटमध्ये   सुमारे ५ लाख८३ हजार कुणबी  समाज   असल्याची नोंद असताना संपुर्ण महाराष्ट्रात फक्त ११ हजार कुणबी असल्याचा जावईशोध शासन नियुक्त समितीने  शासनाला सादर अहवालात केल्याने सातारा जिल्ह्यातील सकल मराठा समाज नाराज झाला असून याचे पडसाद गावोगावी उमटत आहेत.वडजल ग्रामपंचायतींनेही मनोज जरांगे यांना पाठिंबा व विलंब करणाऱ्या शासनाचा निषेध करून सर्व पक्षीय नेतेमंडळींना गाव बंदी घातली आहे.वडजल येथील कॅन्डल मार्च मध्ये गावातील सर्व सकळ मराठा बंधू भगिनी आबालवृध्द व शालेय मुला- मुलींनीही सक्रीय भाग घेत आरक्षणाला पाठिंबा दिला . दरम्यान बुधवारी सुरू झालेल्या साखळी उपोषणास गावातील सर्व जाती धर्मातील लोकांनी पाठिंबा दिला आहे.या वेळी जे.डी.काटकर,यु.आर.काटकर, अजित काटकर यांनी मनोगत व्यक्त केले.
                     वडजल येथे मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी रॅलीत सहभागी आबालवृद्ध व शालेय मुले – मुली .   २ ) मराठा आरक्षणास विलंब करणाऱ्या शासनाचा निषेध करण्यासाठी येथील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!