म्हसवड कॉरिडॉरच्या (एम आय डी सी साठी) भुसंपादनास स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध विजेच्या खांबावर चढून आत्महत्येचा प्रयत्न
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड:
म्हसवड धुळदेव,मासाळवाडी, कोडलकरवाडी, मानेवाडी,लांबमळा, कलढोणेवस्ती, आंबेडकरनगर रुपनवरवस्ती परिसरातील शेकडो भुमिपुत्रांचा म्हसवड येथे होत असलेल्या कॉरिडॉरच्या( एम आय डी सी साठी) भुसंपादनास स्थानिक शेतकऱ्यांनी आज भूसंपादन अधिकारी व म्हसवड सर्कल व इतर चार तलाठी मोजणी करण्यासाठी आले असता तिव्र विरोध करत साईटच्या खांबावर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला त्यानंतर पोलीसांनी आंदोलकांची धरपकड करत पोलिसांनी ताब्यात घेतले व मोजणी सुरु ठेवली

म्हसवड कॉरिडॉर या औद्योगिक वसाहतीला लागणारी जमीनी देण्यास या परिसरातील शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला असून या कॉरिडॉर मुळे आम्ही बेघर होणार आहे आमचे बागायत क्षेत्र कवडी मोलदराने घेऊन आम्हाला आमच्याच जागेतून बाहेर काढले जाणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत जमिनी एम आय डी सी ला देणार नाही वेळप्रसंगी मरण पत्करू पण जमिनी देणार नाही हा पवित्रा या भागातील शेतकरी वर्गांनी घेत तिन वेळा आलेली मोजणी माघारी पाठवली होती आज मात्र उपविभागीय अधिकारी यांनी तहसीलदार विकास अहिर यांनी लेखी आदेश काढून मोजणी अधिकारी भुमिअभिलेखाचे अधिकारी यांचे बरोबर म्हसवडचे तलाठी कार्यालयातील मंडल अधिकारी के पी शेंडे, तलाठी उत्तम अकडमल, विरकरवाडी, मासाळवाडीचे तलाठी गुलाब उगलमोगल, धुळदेवचे तलाठी प्रविण जामनेर, हिंगणीचे तलाठी मालोजी भोसले, व पुळकोटीचे तलाठी बी के वाघमारे यांना सदर जागेवर मोजणी होई पर्यंत थांबण्याबाबत आदेश काढले होते

त्याप्रमाणे आज दुपारी तिन वाजता म्हसवड पोलिस स्टेशनचा फौजफाटा घेऊन म्हसवड माळशिरस रस्त्यापासून मोजणी करण्यासाठी आले असताना या भुसंपादनास विरोध करण्यासाठी शेकडो शेतकरी जमा झाले होते एक शेतकरी अचानक साईटच्या खांबावर चढून मोजणी थांबवा, माघारी जा नाही तर विज वाहक तारेला मी हात लावून आत्महत्या करीन, पोलिस व मोजणी अधिकारी यांना माघारी जा असे म्हणत होता. त्यावेळी अधिकाऱ्यांनी आम्ही मोजणी थांबवतो तुम्ही खाली उतरा असे सांगीतल्या नंतर पाऊन तासाच्या गोंधळा नंतर साईटच्या खांबावरून आंदोलनकर्ते खाली उतरल्यावर पोलिसांनी आंदोलन करणाऱ्यांची धरपकड करून ताब्यात घेतले व मोजनीचे काम पुढे सुरु ठेवले
विलास रूपनवर शेतकरी :
“‘आतापर्यंत या कॉरिडॉरला स्थानिक शेतकऱ्यांनी शांततेने विरोध केला आहे. यावेळी शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत दोन शेतकरी लाईटच्या खांबावर चढून शोले स्टाईल भुसंपादनास विरोध केला. यावेळी पोलीस प्रशासनाकडून बळाचा वापर करून आंदोलनकर्ते यांना ताब्यात घेतले असले तरी आम्ही मरण पत्करू पण आम्ही आमच्या जमिनी देणार नाही “