स्वच्छता हि सेवा// *चला करूया स्वच्छतेसाठी श्रमदान*
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड
*एक तास एक साथ* या कार्यक्रमा अंतर्गत *म्हसवड मेडिकल असोसिएशन* म्हसवड च्या वतीने
आयोजित श्रमदान करण्यात आले असून या श्रमदामनमध्ये म्हसवड मेडिकल असोसिएशन चे सर्व मेंबर उपस्थित होते. स्वच्छ्ता हि सेवा या ब्रीद प्रमाणे बस स्थानक परिसर , शिंगणापूर चौक परिसरातील स्वच्छता केली. यामध्ये बहुतांश ओला कचरा सुखा कचरा, प्लॅस्टिक, इतर कचरा हातामध्ये पाठी, झाडू, फावडे घेवून गोळा करून नगरपरिदेच्या घंटागाडी मध्ये टाकून एकत्र केला. या मोहिमेसाठी डॉक्टरांबरोबर नगरपरिषद कर्मचारी हि उपस्थित होते.
या वेळी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे कौतुक करून त्यांचा म्हसवड मेडिकल असोसिएशनच्या वतीने अभिनंदन पर सत्कार करण्यात आला. एक तास एक साथ या कार्यक्रमासाठी सर्व नागरिकांनी स्वच्छतेसाठी वेळ द्यावा आपला परिसर स्वच्छ ठेवावा व आपले आरोग्य निरोगी राहावे या साठी असोसिएशनचया वतीने श्रमदान करण्यात आले. स्वच्छ म्हसवड सुंदर म्हसवड या साठी आपले एक तास एक साथ वेळ दिल्या बद्दल नगरपालिकेच्या वतीने म्हसवड मेडिकल असोसिएशन चे अध्यक्ष डॉ वसंत मासाळ यांचे सह सर्व म्हसवड मेडिकल असोसिएशन चे आभार मानले..
सबका साथ सबका हाथ