कत्तली साठी आणलेल्या मुक्या जनावरांची दहिवडी पोलीसांनी केली सुटका.

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
सादिक शेख (पोलीस टाईम्स रिपोर्टर)
गोंदवले खुर्द:
दहिवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस   निरीक्षक मा.श्री.अक्षय सोनवणे यांनी धडाकेबाज कामगिरी करत
मौजे गोंदवले (ता. माण) येथून कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या मुक्या जनावरांच्या ओमनी गाडीचा थरारक असा पाठलाग
करून पकडले व मुक्या जनावरांसह ओमनी गाडी व आरोपींना ताब्यात घेऊन 4 लाख 50 हजार रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याबाबत दहिवडी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दहिवडी ते गोंदवले जाणाऱ्या रोडलगत दहिवडी तालुका मान गावच्याहद्दीत सिद्धनाथ मंदिराजवळ रोडवर मुक्तजीर सलीम कुरेशी वय 21 वर्ष, अमित बाळूअहिवळे वय 22 वर्ष, अफसरमहबूब कुरेशी वय 53 वर्ष (सर्व रा. फलटण) सचिन कांबळे, दादा बापू अवघडे  (रा. गोंदवले) यांनी कत्तलीसाठी लहान जर्सी खोंड 7 व म्हशीचे लहान रेडके 5 अशी लहान ओमनी कार जनावरे( एच. 14 एम.ए.ई.6370) मधून बेकायदेशीर रित्या वाहतूक करून जनावरांची कोणतीही व्यवस्था न करता कत्तलीच्या
उद्देशाने घेऊन जात असताना दहिवडी या ठिकाणी पाठलाग करुन पकडण्यात आले असून वरील सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम कलम 5,5अ, सह प्राण्यांचा प्रतिबंध अधिनियम छळ कलम 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. सचिन वावरे पो. कॉन्स्टेबल लक्ष्मण कुचेकर, सुहास गाडे, कुदळे, साबळे, घोरपडे, यांनी ही कारवाई केली.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!