जिल्हा आट्यापाट्या स्पर्धेत क्रांतिवीर शिक्षण संकुलाचे दुहेरी यश.
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड ..प्रतिनिधी
जिल्हास्तरीय आट्यापाट्या खेळ स्पर्धेत क्रांतिवीर शैक्षणिक संकुला अंतर्गतच्या क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवाडी शाळा म्हसवड च्या खेळाडूंनी दुहेरी यश संपादन केले.
जिल्हास्तरीय आट्यापाट्या स्पर्धा नुकत्याच दहिवडी येथे संपन्न झाल्या. जिल्हा क्रीडा अधिकारी सातारा व महात्मा गांधी विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज दहिवडी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय 14 वर्ष वयोगटा खालील मुले व मुली यांच्या आट्यापाट्या खेळ स्पर्धेचे आयोजन केले होते.या स्पर्धेत माण तालुक्यातील शाळा व विद्यालयाचे 16 संघ सहभागी झाले होते.
अंतिम स्पर्धेत म्हसवड येथील क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी शाळा म्हसवडच्या मुले व मुली संघाने अत्यंत चमकदार खेळी करून विजेते पद पटकावले.मुलाच्या संघाचे नेतृत्व आरमान मुल्ला तर मुलीच्या संघाचे पल्लवी पोळ हिने केले.

कोल्हापूर विभागीय शालेय आट्यापाट्या स्पर्धा आगामी कालावधी मध्ये सांगली येथे होणार असून क्रांतिवीर संकुलातील दोन्ही संघ त्यामध्ये सहभागी होणार आहेत.क्रीडा शिक्षक तुकाराम घाडगे,पांडुरंग भोसले,चंद्रकांत तोरणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर,क्रीडा अधिकारी सुनील कोळी, जिल्हा आट्यापाट्याअसोसिएशनचे सचिव ज्ञानेश काळे,क्रांतिवीर संकुलाचे अध्यक्ष कृषिरत्न विश्वंभर बाबर,संस्था सचिव सुलोचना बाबर संकुलातील शिक्षक, पालक प्रतिनिधी यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले.