मोटार सायकल चोरट्यास जेरबंद करुन 1 लाख 65 हजार रुपये किंमतीच्या तीन मोटार सायकली जप्त: उंब्रज पोलिसांची कामगिरी
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
सादिक शेख
नाशिक पोलीस टाईम्स सातारा जिल्हा प्रतिनिधी
उंब्रज, : उंब्रज परिसरात दुचाकी चोरी करणाऱ्या चोरट्यास जेरबंद करत त्याच्या मुसक्या आवळण्याची कामगिरी उंब्रज पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली असून चोरट्याकडून 1 लाख 65 हजार रुपये किंमतीच्या तीन चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात यश मिळवले आहे.या प्रकरणी आरोपी गणेश ऊर्फ पप्पु राजाराम कुलकर्णी (वय 34, रा. बेघरवस्ती, तासवडे ता. कराड) याला उंब्रजपोलिसांनी अटक केली.

याबाबत अधिक माहिती अशी, दि. 17 रोजी उंब्रज परिसरातील श्रीराम बारच्या पार्किंगमधून दुचाकी चोरीस गेल्याची तक्रार दीपक सर्जेराव थोरात रा साई सिटी अपार्टमेंट वाकुर्डे बु ता. शिराळा जि सांगली यांनी उंब्रज पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्या अनुषंगाने तपास करण्याच्या सूचना सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या होत्या. त्यानुसार उंब्रज पोलीस ठाण्याचे पथक तपास करत असताना गोपनीय माहितीनुसार दुचाकी गणेश उर्फ पप्पू कुलकर्णी याने चोरी असल्याचे समजले.
दि. 21 रोजी रात्री 2 वाजण्याच्या सुमारास कुलकर्णी हा मसूर मार्गे उंब्रज बाजूकडे येत असलेची माहिती सहा. पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत बधे यांना मिळाल्याने त्यांनी उंब्रज गुन्हे प्रकटीकरण शाखेचे स्टाफला संशयितास ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या. उंब्रज गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अंमलदारांना शिवडे ता. कराड गावचे हद्दीत मसूर फाटा येथे एकजण मोटर सायकलवरुन येत असताना दिसला. त्याला थांबवून त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव गणेश ऊर्फ पप्पु राजाराम कुलकर्णी वय 34 वर्षे रा. बेघरवस्ती, तासवडे ता. कराड असे सांगितले. त्याच्याकडे असणाऱ्या असणारे मोटर सायकल बाबत विचारणा केली असता त्याने मोटर सायकल उंब्रज गावातून श्रीराम बारचे पार्किंग मधून चोरली असल्याची. कबुली दिली. पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील, अनिल पाटील व डी स्टाफ यांनी त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने आणखी दोन मोटर सायकल चोरल्याची कबुली दिली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पो. ना. दिनेश भोसले हे करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक समीर शेख साहेब, अप्पर पोलीस अधिक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत बधे, पोलीस उपिनीक्षक अनिल पाटील, पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील, पो. कॉ. मयुर थोरात, पो. कॉ. राजकुमार कोळी, पो. कॉ. प्रमोद पाटील, तसेच होमगार्ड नागेश पाटील, यांनी केली आहे.