चव्हाणवाडी पाणवन ता माण गावच्या हद्दीत खंडोबा मंदिरातुन २५ हजार रुपये किमतीचे चांदीचे दोन मुखवटे चोरीस
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड
माण तालुक्यातील चव्हाणवाडी पानवण गावच्या हद्दितील खंडोबा मदिरातून २५ हजार रुपए किमतीचे चांदीचे दोन मखवटे चोरीला गेले असून याप्रकरणी दोन संशयीत चोरट्यापैकी एकास म्हसवड पोलीसांनी अटक केली आहे तर दुसऱ्या चोरट्याचा शोध सुरु आहे या बाबत म्हसवड पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी
दि. 06/08/2023रोजी सकाळी 8.30 वाते 9.00 वाजे सु. मौजे चव्हाणवाडी पानवन तालुका माण गावच्या हद्दीत खंडोबा मंदिरातील अंदाजे 500ग्रँम वजनाची एक म्हाळसा व अंदाजे 500 ग्रँम वजनाची एक बानू देवीची नक्षी असलेले चांदीचे दोन मुखवटे 1000 ग्रॅम वजनाचे चे 25,000/-किमतीचे मुखवटे चोरीस गेले असल्याची फिर्याद हिंदुराव नाना चव्हाण व 61 वर्ष राहणार चव्हाणवाडी पानवन तालुका माण जि. सातारा.यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात दिली असून संशयित आरोपी नावे 1)सौरभ शहाजी तुपे 2) देविदास महादेव तुपे रा पाणवन ता. माण जि. सातारा यांनी संमतीशिवाय मुद्दाम लबाडीने चोरून नेलेली असावी असा माझा संशय असल्याचे आपल्या फिर्यादित म्हटले आहे आहे
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन म्हसवड पोलीस ठाण्याचे सपोनि राजकुमार भूजबळ यांनी त्वरीत हालचाल करुन
सदरच्या गुन्ह्यातील संशियित आरोपी सौरभ सयाजी तुपे याला अटक केली असून यातील संशियित आरोपी नं -२ ची चौकशी चालू आहे.
अधिक तपास सपोनि राजकुमार भुजबळ यांचे मार्गदर्शनाखाली पोउनि श्री डोईफोडे करत आहेत