यशवंत सेनेच्या पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख पदी अशोक काळे यांचे नियुक्ती
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड प्रतिनिधी :
म्हसवड तालुका माण जिल्हा सातारा येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक काळे यांची यशवंत सेनेच्या पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख पदी आज नियुक्ती करण्यात आली. यशवंत सेनेचे अध्यक्ष माणिकराव दांगडे- पाटील यांच्या पत्राद्वारे त्यांना महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब दोडतले यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी बाळासाहेब दोडतले म्हणाले की अशोक काळेंसारखा हिरा यशवंत सेनेमध्ये काम करत असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.आम्ही महाराष्ट्राची संपूर्ण ताकद यशवंत सेनेच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्य करत असलेल्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागे जरूर उभा करू असे आश्वासन यावेळी दिले. तसेच यशवंत सेना ही बी.के. कोकरे साहेबांचे विचार घेऊन संपूर्ण महाराष्ट्रमध्ये नव निर्माण संघटना उभारी घेत आहे.यामध्ये प्रामुख्याने यशवंत सेनेमध्ये धनगर समाजासह इतर सर्व समाजाला न्याय देण्याचे काम संघटना करीत आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यामध्ये असलेला अठरापगड जातीपर्यंत पोहोचण्याचे काम यशवंत सेना करणार आहे. यापुढे यशवंत सेनेच्या माध्यमातून विविध मतदार संघ देखील निर्णायक ठरणार असल्याचे प्रतिपादन बाळासाहेब दोडतले यांनी व्यक्त केले.
या बैठकीमध्ये माजी राज्यमंत्री बाळासाहेब दोडतले, यशवंत सेना प्रदेशाध्यक्ष माणिकराव दांगडे- पाटील,सचिव नितीनदादा धायगुडे, दादासाहेब केसकर, अण्णासाहेब रुपनवर,सुहास सिद, अण्णासाहेब कोळी, मुसाभाई, अनिल लोहार, वैभव गुरव, सामाजिक कार्यकर्ते अजिनाथ केवटे, किसनराव माने, राजेंद्र माने सर, दिलीप चव्हाण, माणिक बाबर,डॉ. सुरेश मासाळ, विलास चोपडे, अतुल धुमाळ विजय पवार, कुंडलिक पुकळे आदी प्रमुख मान्यवर यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र माने सर यांनी केले तर आभार माणिक बाबर यांनी मानले