कर्करोग समुपदेशन व आयुर्वेदिक उपचार केंद्र सातेवाडी ता. वडूज या संस्थेच्या कार्यासाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन :इंजि नितीन तिवाटणे

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड दि (प्रतिनिधी)
  कर्करोग समुपदेशन व आयुर्वेदिक उपचार केंद्र म्हणून कार्य करीत असलेल्या सर्वज्ञ सेवा संस्थाच्या इमारतीचा शुभारंभ सातेवाडी ता. वडूज या ठिकाणी करण्यात येणार असून यासाठी दानशूर लोकांनी आर्थिक मदत करण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष इंजि नितीन तिवाटणे यांनी केले आहे.
      सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या इंजि नितीन तिवाटणे यांच्या आईला सॅन २०१२ ला कर्करोग उद्भवला त्यांच्यावर कराव्या लागणाऱ्या उपचारावेळी येणाऱ्या अडचणींचा त्यांना अनुभव आला.त्याच वेळी नितीन तिवाटणे यांना  कॅन्सरग्रस्तांना मदत करण्याची इच्छा जास्त प्रमाणात वाढली व कर्करोग समुपदेशन, कर्करोगाची भीती कमी करण्याचे प्रयत्न सुरू केले.यावेळी अनेकांनी त्यांना हे कार्य करण्यासाठी एखादी संस्था स्थापन करण्याचा सल्ला दिला. नितीन तिवाटणे यांनाही याची गरज जाणवू लागली व त्यांनी सर्वज्ञ सेवा संस्थाची स्थापन केली.
    फक्त संस्थेची स्थापना करून हा प्रश्न सुटणार नाही.यासाठी इमारत बांधणे गरजेचे होते तसेच प्रशस्त अश्या जागेचीही गरज होती.नितीन शेडे व परिवाराने गट नं २१७ सातेवाडी (वडूज) येथे विना मोबदला एक एकर जागा दिली.यामुळे जागेचा प्रश्न सुटला.आता प्रश्न राहिला तो म्हणजे इमारत व इतर व्यवस्था .
   इंजि नितीन तिवाटणे हे नगरपालिकेमध्ये बांधकाम सल्लागार म्हणून कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करतात त्यामुळे त्यांचीही परिस्थिती हे सर्व एकट्याने करण्याची नाही.सातेवाडी येथे बांधण्यात येणाऱ्या या केंद्रासाठी साधारण दिड ते दोन कोटी रुपये खर्च येणार आहे.कर्करोग समुपदेशन व आयुर्वेदिक उपचार केंद्र आणि वृद्धाश्रम ची इमारत साधारण अंदाजे १०००० चौरस फुटाचे आहे.
      कर्करोग समुपदेशन व आयुर्वेदिक उपचार केंद्रासाठी आर्थिक मदत करू इच्छिणाऱ्या दानशूर व्यक्तींनी
+91 94038 15105 व +91 90114 76600 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन इंजि नितीन तिवाटणे यांनी केले आहे.
   नितीन तिवाटणे यांनी कॅन्सरग्रस्तांना केलेल्या मदतीची दखल घेत महाराष्ट्रातील अनेक संस्थानी  त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
        विविध ठिकाणी कर्करोग जनजागृती बाबत ऑगस्टपासून शिबिरे घेतली जाणार असल्याचे नितीन तिवाटणे यांनी सांगितले.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!