सूरज काकडे यांचा पोलीस अधिक्षक सातारा यांचे कडून प्रशस्ती पत्र देऊन गौरव  

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड
सादिक शेख ( पोलीस टाइम्स रिपोर्टर )
 गोंदवले खुर्द प्रतिनिधी
.सूरज काकडे हे म्हसवड पो. ठाणे येथे कार्यरत आहेत यांनी गु.र.नं. १५५/२०२३ भा.दं.वि.क. ४२०, ४६८, ४७१,४१७,३७९, १२०(ब), ३४ सह आयटी अॅक्ट क.६५.६६ (क),६६(ड) अन्वये दाखल गुन्हयातील अज्ञात आरोपींनी विविध बँकांचे एटीएम कार्ड वापरुन, एटीएम मशिनमध्ये छेडछाड करुन एकुण ३,३७,७२,५००/- रु चा अपहार केलेला होता.सूरज काकडे यांनी सदर आरोपींचा तांत्रिक माहितीचे आधारे शोध घेवून आरोपींना उत्तरप्रदेश राज्यातून ताब्यात घेतले. आरोपींकडे सखोल तपास करुन फसवणूक केलेल्या रकमे संदर्भात संबंधित बँकांना पत्रव्यवहार करुन एकुण ९७,००,०००/-रु रक्कम गोठवून बँकेस परत मिळवून दिली. तसेच आरोपींनी गुन्हा करतेवेळी वापरलेली एटीएम कार्डस् जप्त केले.
एकंदरीत  सूरज काकडे यांनी केलेल्या तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे प्राप्त माहितीच्या अनुषंगाने वैयक्तिक लक्ष पुरविल्यामुळे गुन्हयातील आरोपींना उत्तर प्रदेश येथून अटक करण्यात आली. सदर आरोपींकडे केलेल्या कौशल्यपुर्ण तपासामुळे आरोपींनी फसवणूक केलेल्या रकमेसंदर्भात तातडीने व जलद कार्यवाही करुन संबंधित बँकांना त्वरीत पत्रव्यवहार केल्यामुळे बँकांची एकुण ९७,००,०००/- एवढी रक्कम गोठवून बँकेस परत मिळवून देणे शक्य झाले. तसेच आरोपींकडून गुन्हा करतेवेळी वापरलेली एटीएम कार्डस् जप्त करण्यात  यश प्राप्त केले..सूरज काकडे यांनी म्हसवड पोलीस स्टेशन चे ठाणेदार स.पो.नी. . राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या प्रशंसनीय व सर्वोत्कृष्ट कामगिरीबाबत सातारा जिल्हा पोलीस अधिक्षक . समीर शेख यांनी प्रशंसा पत्र देऊन “हार्दिकअभिनंदन” केले आहे. तसेच भविष्यात देखील आपण कर्तव्यतत्पर राहून जिल्हा पोलीस दलाची क्षमता परिणामकारकता वाढविण्यास प्रयत्नशील रहाल असा दृढ विश्वास  दाखवला आहे.. सुरज काकडे यांच्या प्रशंसनीय कामगिरी बद्दल पोलीस अधिकारी वर्ग,सहकारी व जनतेतून अभिनंदन होत आहे.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!