गटर बांधणीचे काम सुरु केल्याशिवाय उपोषण स्थगित करणार नाही: अजिनाथ लक्ष्मण केवटे आज उपोषणाचा पाचवा दिवस 

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड
म्हसवड 
म्हसवड येथिल  शिक्षक कॉलनी ते   चांदणीचौक (नागोबा कॉम्लेक्स समोर ) येथील गटारीचे अर्धवट काम पुर्ण न केल्याने  नगरपालिकेचे लक्ष वेधण्यासाठी स्टेज व माईक लावुन नगरपालिकेसमोर सुरु विविध प्रकारचे सुरु असलेल्या बेमुदत आंदोलनाचा आज पाचवा  दिवस दिवस असून  नगरपालिका प्रशासनाने त्याची अद्याप दखल घेतली नाही या अनोख्या उपोषणाची जिल्हाभर चर्चा सुरु असुन विविध संघटना पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष येऊन अजिनाथ केवटे यांची भेट घेऊन त्यांच्या उपोषणाला पाठींबा दर्शवला आहे
          म्हसवड मधील चांदणी चौक ते शिक्षक कॉलनी रस्त्यालगत भुयारी गटार   मंजूर केले आणि त्यांचे बिले  देण्यात आली आहेत.पण  या गटारीचे काम अर्धवट सोडून दिले आहे  कारण पुढे त्या गटरीचे पाणी घालवण्यासाठी शेतकरी जागा देत नाहीत मात्र या अर्धवट बांधुन सोडून दिलेल्या गटरीत संपूर्ण शिक्षक कॉलनीतून येणारे सर्व प्रकारचे घाण पाणी नागोबा कॉम्लेक्स इमारती समोर येऊन तेथे पुढील गटरीसाठी खणलेल्या मोठ्या खड्ड्यात साचले असून  त्यामुळे तेथे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे सगळीकडे त्या घाण पाण्याची दुर्गंधी पसरली असून अनेक अबालवृद्ध आजारी पडत आहेत या अर्धवट बांधलेल्या गटरीची बांधल्यापासून साफसफाई न झाल्यामुळे   शिक्षक कॉलनी पासुन येणारे पाणी जागोजागी चॉकअप होऊन रस्त्यावर पसरले आहे   या रस्त्यावर तीन शाळा कॉलैज आहे या रस्त्यावरुन जाता येता या घाण पाण्याचे सिंतोडे अंगावर उडत आहेत या बाबत अनेक वेळा तक्रारी देऊन देखील प्रशासन जाणीवपूर्व दुर्लक्ष करत आहे
         आता पावसाळयाचे दिवस आले आहेत. काही ठिकाणी गटार पुर्ण मातीने भरलेली आहे. . तेथील गटारी लगत मोठ मोठी डबरी पडलेली आहेत. घाण पाण्याला जाण्यासाठी मार्ग नाही. तेथे सांडपाणी, संडासचे पाणी, पाऊसाचे पाणी, अंघोळीचे पाणी एकत्र मिक्स होत असल्याने दुर्गंध पसरत आहे   साठलेल्या पाण्यामुळे डासाचे प्रमाण वाढले आहे. लहान मोठी माणसे आजारी पडत आहेत. जेथे डबरी आहेत. तेथेच पिण्याच्या पाण्याच्या पाईपा आहेत त्यात हे घाण पाणी जात असण्याची देखिल शक्यता आहे. याबाबत नागरीकांनी वारंवार तक्रारी देऊन देखील दखल घेतली जात नाही म्हणून शेवटी उपोषणाचा मार्ग अवलंबवा लागला असून आता काही झालं तरी या गटरीचे काम प्रत्यक्षात चालू होत नाही तोपर्यंत उपोषणातून माघार नाही असा निश्चयच केला   असल्याचे रिपब्लिकन सेना माण तालुका अध्यक्ष अजिनाथ लक्ष्मण केवटे यांनी सांगीतले

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!