ज्ञानेश्वर राक्षे, इरफान पिरजादे यांनी घेतली सादिक खाटीक यांची सदिच्छा भेट .*

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज (संपादक:अहमद मुल्ला )
सादिक खाटिक
आटपाडी : ( प्रतिनिधी )
                महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री ना. मंगलप्रभात लोढा यांचे विशेष कार्य अधिकारी ( O S D ) आटपाडीचे सुपुत्र श्री . ज्ञानेश्वर शत्रुघ्न राक्षे आणि राज्य शासनाच्या आंतरधर्मीय विवाह समितीचे सदस्य खानापूर तालुक्यातील लेंगरे गावचे सुपुत्र इरफानभाई पिरजादे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशचे महासचिव सादिक खाटीक यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली .
                आटपाडी येथील सामाजीक कार्यकर्ते श्री .शत्रुघ्न संभाजी राक्षे यांचे सुपुत्र असलेल्या ज्ञानेश्वर यांचे शालेय शिक्षण आटपाडीतच झाले आहे . जि.प .प्राथमिक शाळा, राजारामबापू हायस्कुल, श्री . भवानी महाविद्यालयांतील शिक्षणानंतर उच्च शिक्षण घेत ज्ञानेश्वर हे  मंत्रालयातील शासकीय सेवेत दाखल झाले .
                गावची, भागाची, इथल्या माणसांची, व्यवस्थेची प्रचंड ओढ, आकर्षण असल्याने, उच्च पदस्थ असलो तरी या मातीशी एकरूप होणारी आम्ही या माऊलीचीच लेकरे आहोत . ही अंतरीची, भावनीक श्रध्देची, नाळ आयुष्यभर जोडलेलीच राहणार असून भागाच्या भल्यासाठी शासकीय चाकोरीतून जे जे करणे शक्य होईल ते ते करण्याचा आपला मानस असेल, असे अंतरीचे बोल ज्ञानेश्वर राक्षे यांनी गप्पांच्या ओघात काढले .
                भिन्न धर्मियांच्या सुख दुःखात सहभागी होत, त्यांच्या व्यथा, वेदना जाणून घेण्याची, त्यांना शक्य ती मदत करण्याची संधी शासकीय समितीच्या माध्यमातून मला मिळाली असलीतरी समितीच्या कक्षे बाहेर जावून *इन्सानियत* ला प्रथम प्राधान्य देण्याचा माझा सदैव प्रयत्न असेल अशी भूमिका इरफान पिरजादे यांनी व्यक्त केली .
                उभय मान्यवरांचे स्वागत करून सादिक खाटीक यांनी, जगाला कवेत घ्या, पण आपले माता – पिता, गुरुजन, सवंगडी, आपली माती, आपली माणसं, आपला परिसर सदैव अंतःकरणात जपून ठेवा . या सर्वांच्या उद्धारातूनच तुम्ही *सारे जहाँ ला* आपलेसे कराल . खुप मोठे व्हा, मोठी उंची गाठा . आयुष्य सार्थकी लावा. तुमच्या दिगंत किर्तीने *भागाने* भारावून गेले पाहीजे . इतके समर्पित होवून काम करा . कोणा मानवाचे रक्त, धर्म जाती पातीच्या भिंती तोडून रक्तगट जुळणाऱ्या दुसऱ्या कोणत्याही मानवास चालत असते, हे त्रिवार सत्य लक्षात घेवून *मानुस* बना, मानुसकी वाढीस लावा . तुम्हांस उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य, दिगंत किर्ती लाभो हीच विधात्याकडे प्रार्थना . असे आशीर्वादाच्या भावना सादिक खाटीक यांनी बोलून दाखविल्या . यावेळी लेंगरेचे सामाजीक कार्यकर्ते जावेद पिरजादे हे उपस्थित होते .

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!