संत भिमा भोई जयंती निमित्त म्हसवड शहरात विविध कार्यकर्माचे आयोजन

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड :
संपूर्ण भोई समाजाचे राष्ट्रीय संत असलेले संत श्री. भिमा भोई यांची जयंती गुरुवार दि. २५ मे रोजी होत असुन यानिमीत्त म्हसवड शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्री.संत भिमा भोई जयंती उत्सव समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्यात सर्वात मोठी जयंती म्हसवड शहरात भोई समाजबांधवांकडुन केली जाते, यंदाही शहरात ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याचे आयोजन करण्यात आले आहे, यानिमीत्त गुरुवार दि.२५ रोजी येथील यात्रा पटांगण येथे उभारण्यात येणार्या भव्य शामीयानात सकाळी ठिक ९ वाजता श्री.संत भिमा भोई यांच्या प्रतिमेचे पुजन केले जाणार आहे, त्यानंतर श्री.संत भिमा भोई यांच्या जिवनावर अधारीत भजनाचा व गायनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे, दुपारी १२ वा. ५ मिनिटांनी श्री. संत भिमा भोई यांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी केली जाणार आहे. त्यानंतर दुपारी कार्यक्रमस्थळी महिलांचा हळदी – कुंकवाचा कार्यक्रम होणार आहे, यानंतर याचठिकाणी जयंती उत्सव समितीच्या वतीने समाजातील सन्मानीय व्यक्तींचा व शालेय हुशार विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव केला जाणार आहे, तर भोई समाजातील दानवीर व्यक्ती म्हणुन सुपरिचित असलेले रावसाहेब भोकरे यांच्या वतीने भोई समाजातील इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप केले जाणार आहे. सायंकाळी ५ नंतर श्री. संत भिमा भोई यांच्या प्रतिमेची पालखीतुन सवाद्य व पारंपरिक पध्दतीने भव्य अशी मिरवणुक काढली जाणार असुन यानिमीत्त राज्यातील सुप्रसिद्ध बँडला येथे पाचारण करण्यात येणार आहे. म्हसवड शहरात श्री. संत भिमा भोई जयंती मिरवणुक ही शहरवासीयांसाठी एक अनमोल अशी पर्वणी असते ही मिरवणुक पाहण्यासाठी शहरात नेहमीच मोठी गर्दी होत असते या शाही मिरवणुकीत भोई समाजातील सर्व महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी होत असतात, या शाही मिरवणुकीनंतर कार्यक्रमस्थळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्री.संत भिमा भोई जयंती उत्सव समितीच्या वतीने देण्यात आली असुन यानिमीत्त म्हसवडसह पंचक्रोशीतील सर्व भोई समाजबाधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!