पत्नीला त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केले,  पतीची म्हसवड पोलीसात तक्रार 

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड 
पळशी ता माण येथील   विवाहीत महिलेने गळफास घेऊन  आत्महत्या केली  या प्रकरणी तिचा पती 
सुनिल पोपट माळवे यांनी आपल्या पत्नीच्या आत्महत्येस विठ्ठल शंकर बिडवे रा पळशी याने  प्रवृत् केले असल्याची फिर्याद म्हसवड पोलीस ठाण्यात दिली 
याबाबत म्हसवड पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी
सुनिल पोपट माळवे  वय42 वर्षे धंदा शेती रा.पळशी  ता.माण यानी म्हसवड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की
मौजे पळशी ता माण गावचे हद्दीत लिंबचौंडी नावचे शिवारात असलेल्या ओढ्यात  माझी पत्नी वैशाली सुनिल माळवे (वय ३८ ) रा पळशी ता माण जि सातारा हिस गेली दोन महिण्यापासून  नेहमीच शेतात जाता येता वरचेवर वाईट हेतुने पाहुन  त्रास देऊन आरोपी  विठ्ठल शंकर बिडवे रा पळशी ता माण जि सातारा हा तिला वारंवार छेड काढून नाहक त्रास देत होता या त्रासाला कंटाळून माझ्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली विठ्ठल बिडवेनेच  तिला आत्महत्येस प्रवृत्त केले आहे. म्हणुन माझी त्याचे विरूद्ध तक्रार असल्याचे म्हटले आहे
या घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी घटनास्थळी भेट देऊन अधिक माहिती घेतली असून पीएसआय भंडारे अधिक तपास करीत आहेत.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!