स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांची धडाकेबाज कारवाई  जबरी चोरीच्या गुन्हयात ६ वर्षापासुन पाहिजे असलेला आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद.

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज (संपादक :अहमद मुल्ला )
सादिक शेख पोलीस टाईम्स रिपोर्टर
 गोंदवले खुर्द :
  पोलीस अधीक्षक, सातारा समीर शेख व  , अपर पोलीस अधीक्षक, सातारा बापु बांगर, यांनी सातारा जिल्हयातील गुन्हयांमध्ये फरारी व पाहिजे असले आरोपी पकडणेबाबत आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने श्री अरुण देवकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांनी  रविंद्र भोरे, सहा. पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांचे अधिपत्याखाली एक पोलीस पथक तयार करून फरारी व पाहिजे असलेले आरोपी पकडणेबाबतआदेश दिले होते.
त्यानुसार दिनांक २४/०४/२०२३ रोजी अरुण देवकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांना बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, पोलीस अभिलेखावरील जबरी चोरीच्या गुन्हयात पाहिजे असलेला आरोपी सुग्रीव अंकुश भंडलकर वय २७ वर्षे रा. खांजड ता. बारामती जि. पुणे हा फलटण येथे येणार आहे. त्याप्रमाणे त्यांनी पथकास सदर ठिकाणी जाऊन आरोपीस पकडून पुढील कारवाई करणेच्या सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे पथकाने फलटण येथे जाऊन त्याचा शोध घेतला त्यावेळी आरोपीने पथकातील पोलीसांना पाहिले असता तो पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्यास पकडून पुढील कारवाईकरीता सातारा शहर पोलीस ठाणे गुरनं ०५/२०१७ भादंवि कलम ३९४ या
गुन्हयाचेकामी सातारा शहर पोलीस ठाणेच्या ताब्यात देण्यात आले आहे.
      सदर कारवाईमध्ये  समीर शेख, पोलीस अधीक्षक, सातारा व . बापु बांगर, अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांचें मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक  अरुण देवकर, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा, . रविंद्र भोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार उत्तम दबडे, सुधीर बनकर, संतोष सपकाळ, आतिष घाडगे, विजय कांबळे, संजय शिर्के, संतोष पवार, संतोष सपकाळ, शरद बेबले, प्रविण फडतरे, अमित सपकाळ, गणेश कापरे, निलेश काटकर, मोहन पवार, विक्रम पिसाळ, प्रविण कांबळे, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, विशाल पवार यांनी कारवाईत सहभाग घेतला असून मा. श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व मा. श्री. बापु बांगर अपर पोलीस अधीक्षक. सातारा
यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!