दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीतील वडगाव या ठिकाणी जुगार अड्ड्यावर छापा* *रोख रक्कम आणि वाहनांसह तब्बल नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त*

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज (संपादक :अहमद मुल्ला )
सादिक शेख पोलीस टाईम्स रिपोर्टर
 गोंदवले खुर्द :
       सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांचा अवैध धंद्यांवरील कारवाईचा धडाका सुरूच
वडगाव ,तालुका माण ,जिल्हा सातारा गावचे हद्दीत खोरी पाझर तलावाजवळ असलेल्या शेतातील शेडमध्ये तीन पाणी पत्त्यावर पैसे पैंजेवर लावून काही इसम जुगार खेळत असले बाबत खात्रीशीर बातमी मिळाल्याने स्टाफ सह सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला असता सदर ठिकाणी
1) पंकज दादा ओंबासे 2)  राजेंद्र आबाजी बागल 3) प्रकाश ब्रह्मदेव जाधव 4 )हनुमंत भगवान करवले  5)राजेंद्र किसन ओंबासे
हे जुगार खेळताना मिळून आले. त्यामुळे तात्काळ त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर दहिवडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम 4, 5, 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून रोख रक्कम आणि वाहनांसह एकूण 8 लाख 53 हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे..सदरची कारवाई  सपोनि  अक्षय सोनवणे,पोलीस हवालदार खांडेकर , पोलीस नाईक प्रमोद कदम ,प्रकाश इंदलकर, महिला पोलीस रजपूत मॅडम  यांनी केली आहे
पोलिस अधिक्षक मा श्री समीर शेख अपर पोलीस अधीक्षक मा श्री बापू बांगर यांनी  त्यांचेअभिनंदन केले.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!