म्हसवड पोलीसांची अवैध दारु विक्रीवर कारवाई: ९ हजार २०५ रुपयाचा माल जप्त
व्हिजन २४ तास न्युज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड
वरकुटे म्हसवड ता माण येथील राजेंद्र सुरेश दोलताडे( वय ३४) याला बेकायदेशीर त्या दारू वाहतूक करताना पकडण्यात आले असून त्याच्या कडून ९हजार २०५ रुपयांचा माल जप्त केला आहे.
मौजे वरकुटे म्हसवड गावचेहद्दीत गावकरी ढाब्याच्या शेजारी राजेंद्र सुरेश दोलताडे दारू घेऊन विक्रीसाठी जात असताना म्हसवड पोलिसांनी त्याला पकडून त्याच्याकडून २२०५ रु. किमतीच्या टॅंगो पंच कंपनीच्या ६३ बाटल्या व ७०५० रु.किमतीच्या मैक डॉंल नंबर१ कंपनीच्या ४७ बाटल्या अशा एकूण ९ हजार २०५ रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला असून याबाबत पोलिस हवालदार विलास वाघमोडे यांनी म्हसवड- पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली संबंधित आरोपीला म्हसवड- पोलीस स्टेशन ने ताब्यात घेतलेले आहे
सदर कार्यवाही ही स पो. नि श्री राजकुमार भुजबळ सो यांच्या मार्गदर्शनाखाली psi श्री विशाल भंडारे. पोलीस नाईक अमर नारणवर, किरण चव्हाण, नितीन धुमाळ,श्रीनिवास सानप,नितीन निकम पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ शिरकुळे ,अनिल वाघमोडे ,सुरज काकडे यांनी केली.