इन्कम रुट कंपनीतील जनतेच्या पैशांवरती डल्ला मारणार्या बड्या हस्तकांचा पर्दाफाश करा-संजय भोसले
व्हिजन २४ तास (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड
शेअर बाजारामध्ये ट्रेडिंग करणारी इन्कम रुट या कंपनीच्या नावाने ठाणे पोलिस उपआयुक्तांकडील नुकतीच झालेली मिसिंग केस आणी गुंतवणूकदारांची उडालेली धांदल पाहता हे प्रकरण दिसते तितके सोपे नसून ,तितकेच गुंतागुंतीचे असून स्वहित साधण्याच्या हेतूने सामान्य जनतेच्या पैशांवरती डल्ला मारणार्या महाभागांचा लवकरात लवकर पोलिसांनी पर्दाफाश करुन जनतेला दिलासा मिळावा असे आवाहन शिवसेना ठाकरे गटाचे सातारा जिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी केले आहे. सदर कंपनीचे ट्रेडर ज्ञानेश्वर घाडगे यांचे वडील लक्ष्मन घाडगे यांनी पोलिस उपआयुक्त ठाणे यांचेकडे ६/४/२०२३ रोजी केलेल्या तक्रार अर्जामध्ये स्पष्ट म्हटले आहे की त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर यानेच सांगितलेवरुन त्याचे जिवीतास काही ईसमांकडून धोका असून तो २९/३/२०२३ पासून गायब आहे.तरी त्याचे जिवाचे बरेवाईट किंवा अपहरण झाले आहे याचा तपास व्हावा अशी तक्रार वडील लक्ष्मण घाडगे यांनी दिली आहे.
सदर कंपनीचे व्यवहार बॅंकेच्या खात्यावरुन होत असतानाच गुंतवणूकदारांचे सांगणेवरुन या कंपनीमध्ये मोठे राजकीय नेते,लोकप्रतिनिधी ,पदाधिकारी व शासकीय अधिकारी यांचा सहभाग दिसून येत असून हस्तक व एजंटांमार्फत काळा पैसा व्हाईट करताना मनी लाॅंड्रीगची प्रकरणे या कंपनीमध्ये घडलेची शक्यता नाकारता येणार नाही कारण एजंट मंडळींच्या कोटींच्या उड्या व व्यवहार बघता आयकर विभाग गप्प कसा राहू शकतो ? असा सवाल करतानाच लक्ष्मी हव्यासापोटी बड्या हस्तींचा बळी ट्रेडर घाडगे ठरु नयेत या आणी अशा अनेक शंका कुशंकाचा पर्दाफाश लवकरात लवकर पोलिसांनी करतानाच, सामान्य गुंतवणूकदारांना एजंटांनी दाखविलेले मृगजळ व आमिशे या अशा फसवणूकांच्या तक्रारी येताच त्या दाखल करुन घेत गैरव्यहार व गैरकारभार करणार्यांना पोलिसांनी धडा शिकवावा असे आवाहनच भोसले यांनी केले आहे.