आ.निलेशजी लंके साहेब यांची म्हसवड मध्ये *”सहारा पान*” ला सदिच्छा भेट
व्हिजन २४ तास न्युज (संपादक अहमद मुल्ला )
म्हसवड
पारनेर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार, कोविड सारख्या महामारीत आपल्या जीवाची पर्वा न करता जनतेसाठी सर्वात मोठे कोविड रुग्णालय स्थापन करून त्या रुग्णासोबत राहणारे महाराष्ट्रातीलच नाही तर भारतातले एकमेव आमदार.निलेशजी लंके साहेब यांनी आज म्हसवड येथे *”सहारा पान
“* च्या शाखा क्र. २ ला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचा सहारा उद्योग समूहा कडून शाल व श्रीफळं देऊन अजीम भाई तांबोळी यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी म्हसवडचे राजे व विकास सोसायटी चेअरमन तेजसिंह राजेमाने, राष्ट्रवादी तालुका प्रमुख अभयदादा जगताप, विक्रमजी शिंगाडे, अशोक राजगे आदी मान्यवर उपस्थित होते.
