माण तालुक्यात ठाकरेंच्या निष्ठावंतांची कमी नाही- ; प्रा.लक्ष्मण हाके*

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज  
By : Ahmad Mulla 
म्हसवड 
                          माण तालुक्यात शिवसेना ठाकरे गटाकडे निष्ठावंतांची कमी नाही हे सातारा जिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी गद्धारांना गुवाहाटीमध्ये जाऊन थेट  केलेल्या आवाहनावरुन दिसून आले असलेचे मत मागासर्गीय आयोगाचे सदस्य व शिवसेना प्रवक्ते प्रा.लक्ष्मणजी हाके यांनी शिवगर्जना अभियानांतर्गत शिवसंवाद पदाधिकारी दहिवडी ता.माण येथील माण,फलटन,खटाव  मेळावा प्रसंगी मांडले.  या मेळाव्यास माजी आमदार बाबूराव माने,नगरसेविका मुंबई सुप्रदा फातर्फेकर,हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते.   
                   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचेसोबत आलेल्या आमदारांपैकी एक जरी  आमदार पडला तर मी राजकारणाचा सन्याश घेऊन शेती करायला निघून जाईन या वक्तव्याची खिल्ली उडवत शेती करायची वेळ त्यांच्यावर लवकरची येईल असे माजी आमदार बाबूराव माने यांनी म्हटले.  युवा शक्तीची ताकद सातारा जिल्ह्यामध्ये वाढविण्याचे आवाहन नगरसेविका सुप्रदा फातर्फेकर यांनी केले.
                   या मेळ्याव्याचे नियोजन उपजिल्हाप्रमुख अमोल आवळे,तालुकाप्रमुख  माण बाळासो मदने,खटाव ता.प्र.शहाजीराजे गोडसे, फलटन ता.प्र.विकास नाळे व प्रदिप झणझणे यांनी केले.   याप्रसंगी तालुका संघटक रामभाऊ जगदाळे,माजी जिल्हाप्रमुख विकास राऊत,जिल्हा संघटिका कल्पना गिड्डे, तालुका संघटिका सलमा शेख,जाधव मॅडम, वाहतूक जिल्हासंघटक संभाजी जगदाळे,दिपक पवार, ग्राहक.सं.सं.जिल्हाप्रमुख चव्हानजी,जगन्नाथ खाडे आदी प्रमुख मान्यवर व शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.
चौकट-                  शिंदे हे मूळचे सातारा जिल्ह्यातील स्वराज्यद्रोही चंद्रराव मोरे यांंचे जावली खोर्‍यातीलच असून गद्बारी त्यांचे रक्तातच दिसून आली असून, ठाकरे कुटुंबाच्या उपकारांना ते विसरले यामुळेच हर्‍या व पाटणच्या नार्‍याला सातारचे शिवसैनिक धडा शिकवतील असे जिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी म्हटले आहे  

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!