निकोप हॉस्पिटल, फलटण तर्फे माण खटाव फलटण मधिल पत्रकारांसाठी मोफत आरोग्य शिबीर : डॉ जे.टी.पोळ

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज
By; Ahmad Mulla
म्हसवड
             कृष्णामाई मेडिकल अँड रीसर्च फाउंडेशन, फलटण संचलित  निकोप हॉस्पिटल, फलटण तर्फे  पत्रकारांच्या मोफत १८ प्रकारच्या मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन केले असून माण खटाव फलटण च्या पत्रकारांनी आरोग्य तपासणी करीता फलटण येथे उपस्थित रहावे असे आवाहन  डॉ. जे.टी.पोळ यांनी केले आहे 
डॉ पोळ यांनी या शिबीरा बाबत बोलताना म्हटले की
        पत्रकार दिनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सुमारे एक महिनाभर आपण सर्वांनी विविध उपक्रमाद्वारे राज्य व राष्ट्रीय स्तरावर वृत्तपत्र क्षेत्राची जबाबदारी पार पाडताना घेतलेल्या भूमिकांचे अवलोकन केले आहे.
        आता नवीन वर्षाची वाटचाल सुरु करताना आपण सर्वजण आरोग्य दृष्टया सक्षम व सुदृढ असले पाहिजे त्यासाठी निकोप हॉस्पिटल, फलटण वर्धापन दिन आणि पत्रकार दिनाचे औचित्य साधून राबविण्यात येणार असलेल्या विशेष उपक्रमाची घोषणा आणि आपण सर्वां समवेत असलेले प्रेमाचे  नाते अधिक घट्ट करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
    तरी आपण सर्वांनी रविवार दि. १९ फेब्रुवारी २०२३ रोजी कृष्णामाई मेडिकल अँड रीसर्च फाउंडेशन, श्री विश्व शिवानंद आयुर्वेदिक हॉस्पिटल,
लायन्स आय हॉस्पिटल, फलटण,उपजिल्हा रुग्णालय, फलटण,तालुका मेडिकल ऑफिसर, फलटण,महाराष्ट्र असोसिएशन ऑफ फिजिशियन, मुंबई यांच्या माध्यमातून या शिबीरात –
• इ. सी. जी., इको कार्डिओग्राफी, कलर डॉपलर, रक्तातील साखर, हाडाचा ठिसूळपणा, फुफ्फुस क्षमता तपासणी आणि हृदयरोग तज्ञ डॉक्टरांचा सल्ला, मार्गदर्शन व औषधे मोफत देण्यात येतील.
● या शिबीरामध्ये मधुमेह, हृदयरोग, रक्तदाब, किडनी, मुतखडा, दमा, थायरॉईड, पोटाचे विकार,दंत तपासणी, नेत्र तपासणी तज्ञ डॉक्टरांमार्फत मोफत केली जाईल. एम. आर. आय. व अँजिओग्राफी ५०% सवलतीच्या दरात केली जाईल.
• मोतीबिंदू शस्त्रक्रिया एस. डी. एच व लायन्स आय हॉस्पिटल तर्फे मोफत केल्या जाणार आहेत. तरी माण ,खटाव व फलटण  तालुक्यातील  सर्व पत्रकारांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. जे. टी. पोळ यांनी केले आहे.
      त्याचप्रमाणे सर्व पत्रकारांसाठी रविवार दि. १९ रोजी रात्री ८.३० वाजता हॉटेल आर्यमान, फलटण येथे  भोजनाची व्यवस्था करण्यात आली  आहे. तरी सर्व पत्रकारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. जे. टी. पोळ यांनी केले आहे.
स्थळ –
निकोप हॉस्पिटल, रिंग रोड,
फलटण, जि. सातारा.
वेळ : रविवार दि. १९/०२/२०२३ रोजी सकाळी ११:०० ते ३:००
वाजेपर्यंत

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!