श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालयाचे विद्यापिठ इंटर झोन पावर लिपिंग स्पर्धेत घवघवीत यश
व्हिजन २४ तास न्यूज
BY ; Ahmad Mulla
म्हसवड ;प्रतिनिधी
श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय दसरा चौक कोल्हापूर येथे चालू असलेल्या शिवाजी विद्यापीठ अंतर विभागीय (इंटर झोन) स्पर्धा सुरु असून १७ जानेवारी रोजी झालेल्या पावर लिपिंग स्पर्धेमध्ये श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालय म्हसवडच्या खेळाडूंनी घवघवीत यश मिळवून महाविद्यालयाचे नाव उंचावले
या पावर लिंपिग स्पर्धेत
१) चैतन विलास जरक याने १०५किलो वजनी गटामध्ये द्वितीय क्रमांक मिळवला असून त्याने उचललेले वजन squat-175kg ,Bench press-110kg deadlift-190kg Total-475kg
२) मुराद सिकंदर पठाण याचा या स्पर्धेमध्ये ८३ किलो वजनी गटामधून तृतीय क्रमांक मिळवला असून त्याने उचललेले वजन squat -135kg,Bench press-75kg, Deadlift -175kg,Total-385kg
या यशस्वी खेळाडूंना प्रा. प्रियंका खांडेकर व प्रा. तायाप्पा शेंडगे यांनी मार्गदर्शन केले. या यशस्वी खेळाडूंचे फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे मा. सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फ. ए . सोसायटीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर, फ. ए. सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीव नाईक राजे निंबाळकर प्रशासन अधिकारी मा. श्री. अरविंद निकम, ग .कौ.स.श्रीमंत पृथ्विराज राजेमाने अधिक्षक मा. श्री श्रीकांत फडतरे, श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. टी. कदम सर आणि प्रा. शिंदे सर, प्रा. शिखरे सर, प्रा.सावंत सर, प्रा. लोखंडे सर आणि प्राध्यापक व प्राध्यापकेत्वर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.