जिल्हा स्तर शालेय थांग ता क्रीडा स्पर्धा मध्ये बिदाल शाळेचे यश
व्हिजन२४ तास न्यूज म्हसवड
By; दौलत नाईक प्रतिनिधी
दहिवडी ;
वडूज तालुका खटाव येथे झालेल्या जिल्हास्तरीय थांग ता स्पर्धेमध्ये नव महाराष्ट्र विद्या मंदिर बिदाल च्या विद्याथ्यानी मोठे यश संपादन केले या शाळेच्या चार विद्यार्थांनी सुवर्ण पदक मिळवून त्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली .
अनुराधा चंद्रकांत जगदाळे रुद्र बापूराव जगदाळे,स्वरा अरविंद चिरमे,आयान शाकीरहुसेन पेन्शनर यांनी आपआपल्या गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवून विभागीय साठी निवड झाली तर अमृता नेताजी यादव ,ईश्वरी अनिल ढालपे ,अनुराज मानिकराव जगदाळे , मुजमिल मुल्ला यांनी द्वितीय क्रमांक मिळवला तर ओम नवनाथ जगदाळे यांनी तृतीय क्रमांक मिळवला
या स्पर्धेसाठी एकुण १४८ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता .वय व वजन असे वेगवेगळे गट करण्यात आले होते.वरील सर्व विधार्थ्यांनी यश संपादन केल्याबद्दल मुख्याध्यापक श्री. सावंत ए. एस तसेच क्रीडा शिक्षक श्री. कांबळे ए. एस मार्गदर्शक श्री. बोराटे एस. आर प्रशिक्षक गोडसे सर सर्व शिक्षक, विध्यार्थी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .
या वेळी जिल्हा ट्रडीशनल थांग ता असोसिएशनचे सर्व प्रशिक्षक, पदाधिकारी उपस्थित होते.