इंजिनिअर सुनील पोरे यांचा आमरण उपोषणाच्या दणका, रस्ता १५ दिवसांत पुर्ण करण्याचे लेखी पत्र. सर्व मागण्या मान्य झाल्यामुळे इंजि सुनील पोरे यांचे उपोषण मागे दुसरा लढा म्हसवड बसस्थानक
व्हिजन २४ तास न्यूज
BY:Ahmad Mulla
म्हसवड (प्रतिनिधी)
२६ जानेवारी रोजी इंजि.सुनील पोरे यांनी सुरु केलेल्या उपोषणाला म्हसवडकर नागरिकांचा मिळत चाललेला मोठा पाठींबा पहाता प्रशासन खडबडून जागे झाले त्वरीत हालचालीना वेग येऊन महाराष्ट्र राज्य रस्तेविकास मंडळाच्या कार्यकारी अभियंता अश्विनी घोडके यांनी संबंधित मेघा इंजिनियरिंग हैद्राबाद यांना त्वरीत उपोषण स्थळी पाठवून सर्व मागण्या मान्य करत असल्याचे पत्र देऊन उपोषण सोडण्यासाठी विनंती केली त्यानुसार इंजि.सुनील पोरे यांनी १५ दिवसात काम पूर्णकरणार असल्याचे लेखी पत्र दिल्यामुळे आपले उपोषण मागे घेतले
सातारा-पंढरपूर फोरलेन चे काम गत पाच सहा वर्षापासून अत्यंत, संथ गतीने सुरू असून म्हसवड पालिका हद्दीतील साखळी पूल ते पिलीव घाटापर्यंतचा रस्ता गेली सहा वर्षापासून नुसता खनुण ठेवला आहे. या रस्त्यावर अनेक खड्डे पडलेले आहेत. त्याबाबत अनेक संस्था संघटनानी आवाज उठवल्या नंतर या खड्यांवर नुसती माती टाकुन खड्डे बुजवण्या चा फार्स करण्यात आला.
मात्र या मातीमुळे रस्त्यावरून वाहने जाताना व येताना मोठ्या प्रमाणानार धुरळा उडत होता त्यामूळे रस्त्याच्या कडेला असणऱ्या , व्यावसाईकांवर उपासमारीची वेळ, नागरीकांना होणारा त्रास ,अनेक जनांचा मृत्यु याबाबत इंजि. सुनील पोरे यांनी म्हसवड शहराच्या रस्त्यालगत व चौका चौकात बॅनर लावून प्रशासनाला जाब विचारला होता.
यांनी गत दोन महिन्यापुर्वी याबाबत आमदार जयकुमार गोरे (भाऊ )याबाबत चर्चा करुन त्यांच्या बरोबर केंद्रीय रस्ते विकास मंत्री ना. गडकरी यांनाच भेटुन येथील संपूर्ण परिस्थिती कथन केली होती त्यावेळी ना. गडकरी यांनी याबाबत एम. एस. आर. डी. सी. ला याबाबत जाब विचारत त्वरीत काम सुरु करण्याचे आदेश दिले होते, मात्र ना. गडकरी यांनी आदेश देवुनही सदर कामाबाबत संबधित विभागाकडुन म्हणावी तेवढी हालचाल दिसुन न आल्यानेच अखेर पोरे यांनी आंदोलनाचे हत्यार उपसत प्रत्यक्षात 26 जानेवारी रोजी आमरण उपोषणाचा इशारा दिला होता याचा परिणाम म्हणून रस्ता दुरुस्ती कामाला सुरुवात झाली मात्र हे प्रशासनाने चालू केलेले काम म्हणजे नुसते तोंडाला पाने पुसण्या सारखे असल्याचे इंजि. सुनिल पोरे यांनी म्हटले होते व आपल्या विविध मागण्या घेऊन२६ जानेवारी रोजी सातारा पंडरपुर रोडवर शिंगणापूर चौकात आमरण उपोषणाला सुरुवात केली
सकाळी १० वाजता सुनील पोरे यांनी छ.शिवराय, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून सिद्धनाथ मंदिरात दर्शन घेऊन उपोषण स्थळी स ११ वाजता आमरण उपोषणास सुरुवात केला या वेळी त्यांच्या बरोबर पत्रकार पोपट बनसोडे ,विजय टाकणे , विशाल माने ,अहमद मुल्ला अनिल व्होरा ,अ़ॅड.राजेंद्र भागवत ,दिपक फुटाणे, रमेश पतंगे, नगरसेवक संजय सोनवणे ,चंद्रकांत पोरे, दत्ता शिंदे आकाश मेंढापुरे ,विशाल ऐवळे, संजय भागवत ,ऍड.शुभम पोरे ,आकाश पिसे, विकास खासबागे,छोटू गोंजारी ,आदी मान्यवर उपस्थित होते .
उपोषणात कोणतेही पक्षीय राजकारण न करता म्हसवडकर नागरीकांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या मागण्या घेऊन इंजि. सुनील पोरे यांनी उपोषणाला सुरुवात केली असल्यामुळे शहरातील हजारो प्रतिष्ठीत नागरीकांनी उपोषण स्थळी येउन आपला सहभाग नोंदवला तसेच रासपचे आप्पासाहेब पुकळे माजी सभापती श्रीराम पाटील,दिवडचे सदा अण्णा सावंत, रिपब्लीकन सेनेचे अजिनाथ केवटे ,बसपा चे महेंद्र सराटे, युक्रांतचे राजकुमार डोंबे यांनी उपस्थित राहुन आपला पाठींबा दिला.
उपोषणाला वाढता पाठींबा पहाता प्रशासन खडबडून जागे झाले त्वरीत हालचालीना वेग येऊन महाराष्ट्र राज्य रस्तेविकास मंडळाच्या कार्यकारी अभियंता अश्विनी घोडके यांनी मेघा इंजिनियरिंग हैद्राबाद यांना त्वरीत उपोषण स्थळी पाठवून सर्व मागण्या मान्य केले असल्याचे पत्र देऊन उपोषण सोडण्यासाठी विनंती केली या पत्रात मेघा इंजिनीअरिंग ने पुढील मागण्या मान्य करत असल्याचे लेखी पत्र दिले
सातारा पंढरपूर हाय वे संपुर्ण दर्जेदार करुन देणार,
कोर्टकेस असलेल्या ठिकाणी रस्ता वहातुकीस योग्य करुन देणे ,
धुळ उडत असेल त्या ठिकाणी वारंवार पाणी मारणे,
रस्त्याच्या कडेला पावसाचे पाणी वाहुन जाण्यासाठी नवीन गटर बांधणे ,
वृक्षतोड केलेल्या ठिकाणी दुप्पट वृक्षलागवड करणे,
२० दिवसात शहरा लगतचा रस्ता पूर्ण करुन दिला जाईल व ३१ मार्च अखेर साखळी पुलाजवळील काम पूर्ण करण्यात येईल.
असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आपण आमरण उपोषण स्थगीत करत असल्याचे इंजि.सुनील पोरे यांनी जाहीर केले तसेच यापुढील दुसरा लढा हा म्हसवड बसस्थानक साठी लढणार असल्याचा संकल्प ही जाहीर केला
यावेळी मेघा इंजिनियरींग हैद्राबादचे प्रोजेक्ट मॅनेजर कर्मा महेंदर यांचे हस्ते शरबत प्राशन करुन आपले उपोषण सोडले