ब्रम्हाकुमारींतर्फे ” नशामुक्ती महाअभियान,,” मोदीजींच्या आदेशानुसार,, 10 कोटी विद्यार्थ्यांपर्यंत प्रतिज्ञा पोहोचविण्याचे उद्दीष्ट,

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

दिलीप कीर्तने 
म्हसवड ( प्रतिनिधी )

         प्रजापिता ब्रह्मकुमरी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या मेडिकल विगतर्फे दादी प्रकाशमणीजी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रधानमंत्री मोदीजींच्या आदेशानुसार 10 कोटी विद्यार्थ्यांपर्यंत “नशामुक्ती महाअभियान -प्रतिज्ञा ” पोहोचविण्याचे उद्दीष्ट या विश्वविद्यालयातर्फे पूर्ण करण्यात येत आहे ,असे म्हसवड सेंटरच्या प्रमुख संचालिका सुनिता दीदी यांनी सांगितले.
          म्हसवड सेंटरच्या वतीने म्हसवड व परिसरातील फलटण एज्युकेशन सोसायटीच्या, श्री सिद्धनाथ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज , श्री महाराणी अहिल्यादेवी होळकर शिक्षण संस्था, सांगलीच्या दि न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल, व ज्युनिअर कॉलेज, ज्ञानवर्धिनी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, विरकरवाडी, ता. माण, कर्मवीर भाऊराव पाटील कृषी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स,देवापूर, ता. .माण,शिक्षण प्रसारक सेवा मंडळ मार्डीच्या इंदिरा गांधी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, दिवड आदी शाळा व कॉलेज मधील हजारो विद्यार्थी व विद्यार्थींनींपर्यंत नशामुक्ती महाअभियानाची प्रतिज्ञा पोहोचविण्याचे महान कार्य येथील ओम् शान्ति सेंटर कडून करण्यात आले.
        यावेळी विद्यार्थी व नागरिकांना तंबाखू ,गुटखा, मावा, सिगारेट, दारू आदी आमली पदार्थांपासून दूर राहण्याचे तसेच विशेष म्हणजे विद्यार्थांनी मोबाईल पासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले.
        दरम्यान निरोगी व व्यसनमुक्त समाज निर्मिती साठी युवकांनी कोणत्याही व्यसनापासून दूर राहण्याचा आजपासून महा सकल्प करावा, असे आवाहन ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने करण्यात आले.
वरील सर्व ठिकाण चे कार्यक्रम यशस्वी पणे पार पाडण्यासाठी, सेंटरच्या मुख्य संचालिका सुनिता दीदी, तारा बहन, वनिता बहन, विजया बहन,, शैला बहन, मनिषा बहन, वैशाली बहन, सुरेश भाई, श्री निवास भाई, जालिंदर भाई, राजेंद्र भाई, दिलीप भाई आदींनी परिश्रम घेतले.
========================


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *