तहसीलदारांचा सही व शिक्का मारून बनावट केशरी शिधापत्रिका बनविणाऱ्या पप्पू आवटेवर गुन्हा दाखल आरोपी पप्पू आवटे दहिवडी पोलिसांच्या ताब्यात
प्रतिनिधी; दौलत नाईक
दहिवडी:
दहिवडी ( ता. माण ) येथील पप्पू बाळासाहेब आवटे यांनी तात्कालीन तहसीलदार बाई माने यांची बनावट सही व शिक्का मारून व केसरी शिधापत्रिका तयार करून दिल्याबद्दल पप्पू आवटे यांच्यावर दहिवडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
दहिवडी येथील किरण युवराज पवार, सायबु दिलीप चव्हाण, सुरेश जीवा चव्हाण, तिघेही राहणार दहिवडी तालुका माण जिल्हा सातारा यांचेकडून सूर्यकांत उर्फ पप्पू बाळासाहेब आवटे राहणार दहिवडी याने रक्कम रुपये 3300 प्रत्येकी घेऊन केशरी शिधापत्रिका बनवून दिली. या केशरी शिधापत्रिकेवर तात्कालीन तहसीलदार बाई माने यांची बनावट सही करून तहसीलदार माण यांचा बनावट शिक्का मारून गैरप्रकार केल्याचे उघडकीस आल्यानंतर माण तहसील कार्यालयातील कर्मचारी नोकरी रोजगार हमी अव्वल कारकून व अतिरिक्त कार्यभार पुरवठा निरीक्षक तहसील माण श्री.राहुल जाधव यांनी सदर प्रकरणाची तक्रार दहिवडी पोलीस ठाण्यात दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर प्रकरणाचा पुढील तपास दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे करत आहेत.