रोटरमध्ये पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
व्हिजन २४ तास न्यूज
कुलदीप मोहिते
उंब्रज प्रतिनिधी :
कराड तालुक्यातील अंधारवाडी येथे शेतातील रोटरमध्ये पडल्याने एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. ३०) सायंकाळी घडली.
मृताचे नाव राजेंद्र भागवत बाबर (वय ४८, रा. अंधारवाडी, ता. कराड) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंधारवाडी गावच्या हद्दीतील वाघजाई मंदिरामागील परिसरात सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, उंब्रज येथे आणण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची नोंद उंब्रज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्रमांक २९/२०२६ अशी करण्यात आली आहे. मृतदेहाचे पंचनामा व शवविच्छेदनाची कार्यवाही सुरू असून, नेमके मृत्यूचे कारण तपासाअंती स्पष्ट होणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार पाटील करीत आहेत.

