गोंदवले बुद्रुक येथे बेकायदा दारू विक्रीवर दहिवडी पोलिसांची कारवाई; ५ हजारांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

दहिवडी :-प्रतिनिधी 

दहिवडी पोलीस ठाण्याच्या पथकाने गोंदवले बुद्रुक (ता. माण) येथे बेकायदा देशी व विदेशी दारू विक्री करणाऱ्यावर कारवाई करत ५ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शुक्रवार दि. १६ मे रोजी सायंकाळी करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोंदवले बुद्रुक गावातील आरोपी अहमद बाबुभाई तांबोळी (वय ७८) यांच्या राहत्या घराच्या आडोशाला बेकायदा बिगर परवाना देशी दारू विक्रीसाठी साठा ठेवण्यात आला होता. दहिवडी पोलिसांनी छापा टाकून देशी टॅंगो पंचच्या २१ सीलबंद बाटल्या, इम्पेरियल ब्ल्यूच्या ८ काचेच्या बाटल्या तसेच मॅकडॉल नंबर १ च्या ८ प्लास्टिक बाटल्या असा एकूण ५,१२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गणेश भगवान खाडे यांनी फिर्याद दिली असून आरोपीविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस नोटीस देण्याची तजवीज करण्यात आली आहे.

ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास पोलीस हवालदार आर. पी. खाडे हे करत आहेत.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *