पंढरपूरमध्ये धक्कादायक घटना! यमाई-तुकाई तलावात विषबाधेची शक्यता; मासे मृत, नागरिकांमध्ये भीती

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज
अदनान कल्यानी
पंढरपूर | प्रतिनिधी

पंढरपूर शहरातील नवीन कोर्टासमोरील यमाई-तुकाई तलावात अचानक विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिनांक ३ एप्रिल रोजी तलावातील पाण्यात मोठ्या प्रमाणावर मासे मृत अवस्थेत आढळून आले, तर काही मासे पाण्यात तडफडताना दिसत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, तलावाच्या पाण्याचा रंग आणि वास अचानक बदलल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. यामुळे पाण्यात कोणतेतरी रासायनिक किंवा घातक पदार्थ मिसळल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विशेष म्हणजे, या तलावात परिसरातील गवळ्यांच्या म्हशी नियमितपणे उतरतात. त्यामुळे या दूषित पाण्याचा परिणाम दुधाच्या गुणवत्तेवर होण्याची भीती व्यक्त होत आहे. जर म्हशींनी हे पाणी पिल्यास किंवा त्यात वेळ घालवल्यास त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर तसेच दूध उत्पादनावर होऊ शकतो, अशी चिंता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या घटनेची तात्काळ दखल घेऊन संबंधित प्रशासनाने पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवावेत व तलाव परिसरात आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. नागरिकांनीही खबरदारी म्हणून तलावाच्या पाण्याचा वापर टाळावा, तसेच जनावरांना या पाण्यात जाण्यापासून रोखावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

जोपर्यंत पाणी पूर्णपणे स्वच्छ आणि सुरक्षित असल्याचे स्पष्ट होत नाही, तोपर्यंत नागरिकांनी सतर्क राहणे अत्यावश्यक आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *