उंब्रज येथे ‘एकनाथ हिरक आरोग्य वर्ष’ अंतर्गत महाआरोग्य शिबिर उत्साहात

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
कुलदीप मोहिते
उंब्रज, प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एकसष्ठी निमित्त सुरू असलेल्या ‘एकनाथ हिरक आरोग्य वर्ष’ उपक्रमांतर्गत उंब्रज येथे शनिवारी मोफत महाआरोग्य तपासणी, औषधोपचार व रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले.

उंब्रज येथील सौभाग्य मंगल कार्यालय, कॉलेज रोड येथे श्री शिवयोद्धा प्रतिष्ठान यांच्या नियोजनातून हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला सह्याद्री हॉस्पिटल कराड , गांधी फाऊंडेशन, विघ्नहर्ता क्लिनिक, मोरया डेंटल क्लिनिक आणि यश लॅबोरेटरी यांचे सहकार्य लाभले. ग्रामीण व शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

शिबिरात एकूण १५५ रुग्णांची विविध वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ४१ जणांची रक्त तपासणी, २५ मोतीबिंदू रुग्णांची तपासणी, तसेच १५० नागरिकांची नेत्र तपासणी करून त्यांना चष्मे देण्यात आले. याशिवाय ५० रुग्णांची दंत तपासणी, ४५ रुग्णांची कान-नाक-घसा तपासणी, तसेच सह्याद्री हॉस्पिटलच्या तज्ज्ञांकडून हृदय व व्हेरिकोज व्हेन्स तपासणी करण्यात आली.

दरम्यान, शिबिरात ३५ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून समाजसेवेचा आदर्श ठेवला. सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र व आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

शिबिराचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे व जयवंतराव शेलार (शिवसेना जिल्हाप्रमुख) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गांधी फाऊंडेशनचे अध्यक्ष धीरज गांधी, श्री स्वामी समर्थ सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अविनाश काशिद, सह्याद्री हॉस्पिटलचे प्रख्यात न्युरोसर्जन डॉ. प्रसन्न पाटणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी श्री शिवयोद्धा प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत भविष्यातही अशा आरोग्य शिबिरांचे आयोजन करून रुग्णसेवा सुरू ठेवावी, तसेच आवश्यक ते सहकार्य देण्याचे आश्वासन दिले.

कार्यक्रमात मोरया क्लिनिकचे डॉ. ऋषिकेश महापरळे, विघ्नहर्ता क्लिनिकच्या डॉ. पूजा शिंदे-कदम आणि यश लॅबचे अमोल पवार यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

यावेळी श्री शिवयोद्धा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष बेडके, उपाध्यक्ष शरद जाधव, खजिनदार रणजीत कदम, सचिव महेश जाधव, तसेच अमोल कांबळे, सचिन जाधव, कॅप्टन इंद्रजीत जाधव, विक्रम सूर्यवंशी, शिवम बेडके, अभिषेक बेडके, संकेत यादव व महेंद्र बेडके आदी उपस्थित होते.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *