बाळासाहेब पिसे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड : (प्रतिनिधी )
शहरातील सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या युवा नेते बाळासाहेब पिसे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगराध्यक्ष नितिनभाई दोशी यांनी त्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार केला. यावेळी त्यांना शुभेच्छा देत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या.

या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी बाळासाहेब पिसे यांच्या सामाजिक व लोकहिताच्या कामांची प्रशंसा केली. समाजातील विविध उपक्रमांमध्ये ते नेहमीच पुढाकार घेत असल्याने त्यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

सत्कार समारंभ साध्या पण उत्साही वातावरणात पार पडला. यावेळी सुजय दोशी, निलेश सरतापे, नाना मासाळ, बाबू मुल्ला तसेच श्रावणी पिसे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी बाळासाहेब पिसे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या उत्तम आरोग्य व यशस्वी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *