भाजपा कडून कराड उत्तरेत निष्ठावंताला वाटाण्याच्या अक्षता तर उपऱ्याना पेढे,???????

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला

उंब्रज कराड (कुलदीप मोहिते)

भाजपाची पावर गुल तर राष्ट्रवादी आनि शिवसेना पावर फुल्ल ,31 डिसेंबर रोजी उंब्रज येथे होणाऱ्या उपमुख्यमंत्री मा एकनाथजी शिंदे यांच्या सभेमुळं कराड उत्तरेतील राजकिय समीकरण बदलणार,!*
      एका चुकीच्या निर्णया मुळे भाजपाला zp ps मध्ये मोठा फटका , निष्ठावंताच्या नाराजी मूळ भाजपाच्या मताचा टक्का घसरणार,तर येत असलेल्या ग्रामपंचायत निवडणूकित भाजपा विरोधात कराड उत्तरेत तिसरी आघाडी निर्माण होणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत ,गेले कित्येक वर्षे भाजपा सोबत काम करणाऱ्या कार्यकर्त्याना डावलून नवीन कार्यकर्त्यांना उमेदवारी या मधील काही कार्यकर्ते वगळता ज्याची पत आनी ओळख समाजात नाही अशा लोकांना दिलेली उमेदवारी ही भाजपाला नामुष्की सहन करायला लावणारी आहे, ज्यांनी पक्षाच्या साठी आपल्या जीवाचे रान केले अश्याच कार्यकर्त्यां पक्षाने वाटाण्याच्या अक्षता दिल्या आहेत, यामूळ भाजपा ने कराड उत्तरेत आपले जे वजन निर्माण केलं होतं ते आता कमी होत आहे तर या नाराजी मुळे भाजप मधील कार्यकर्ते यांनी उपमुख्यमंत्री मा एकनाथ जी शिंदे गटात प्रवेश केला आहे आनि आणखी कार्यकर्ते ही प्रवेश करणार आहेत भाजपा मधील नाराजी चा जास्तीत जास्त फायदा हा कराड उत्तर मध्ये शरदचंद्र जी पवार यांच्या राष्ट्रवादी आणि शिंदे गटाला नक्कीच होणार आहे,


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *