केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालयात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला

म्हसळा – सुशील यादव

तालुक्यात वाचन संस्कृती जोपासणारे नामांकित केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालय म्हसळा येथे थोर समाजसुधारक स्वामी विवेकानंद व स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ साहेब यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

वाचनालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.या प्रसंगी माजी सभापती महादेव पाटील व कृषी अधिकारी विनोद सोनवणे यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी या थोर विभूतींच्या विचारांचा समाजघडणीत असलेला मोलाचा वाटा अधोरेखित केला.

      कार्यक्रमास वाचनालयाचे अध्यक्ष संजय खांबेटे,सचिव अशोक काते,माजी सभापती महादेव पाटील,पर्यवेक्षिका दिपाली पालवे,कृषी सहाय्यक सुशीलकुमार गाडगे, वरिष्ठ लिपिक विनोद सोनवणे,नरेश जामकर,परशुराम नाक्ती,ग्रंथपाल उदय करडे,लिपीक सायली चोगले,प्राची मेंदडकर यांच्यासह अनेक मान्यवर व वाचनप्रेमी उपस्थित होते.या कार्यक्रमातून युवकांनी स्वामी विवेकानंदांचे प्रेरणादायी विचार आत्मसात करून राष्ट्रनिर्मितीसाठी कार्य करावे तसेच राजमाता जिजाऊंच्या आदर्शातून संस्कारक्षम पिढी घडवावी असे आवाहन करण्यात आले.

     कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल उपस्थितांनी वाचनालयाच्या उपक्रमाचे कौतुक केले.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *