विकासकामांचा धडाका आणि जनसामान्यांशी संवाद; म्हसळा पाभरे गणात मंत्री आदिती तटकरे यांचे जल्लोषात स्वागत!”
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसळा : सुशील यादव
विकासकामांच्या जोरावर आणि जनसामान्यांच्या विश्वासाच्या बळावर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला भक्कम पाठबळ द्या, असे आवाहन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री नामदार आदिती तटकरे यांनी केले.
म्हसळा तालुक्यातील पाभरे पंचायत समिती गणात आयोजित सदिच्छा गावभेट दौऱ्यादरम्यान त्या बोलत होत्या. या दौऱ्यात ग्रामस्थांनी त्यांचे अभूतपूर्व आणि जल्लोषात स्वागत केले.
७ जानेवारी २०२६ रोजी मंत्री आदिती तटकरे यांनी पाभरे गणातील कांदळवाडा, निगडी, ढोरजे, गायरोने, घोणसे, चिचोंडे, विठ्ठलवाडी, पाभरे, खारगाव बुद्रुक, सुरई आणि काणसेवाडी या गावांना व वाड्यांना भेटी दिल्या. दिवसभर चाललेल्या या दौऱ्यात त्यांनी गावनिहाय विकासकामांचा आढावा घेतला आणि ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेत त्या त्वरित सोडवण्याचे आश्वासन दिले.
’निधीची कमतरता भासू देणार नाही’
यावेळी मार्गदर्शन करताना ना. आदिती तटकरे म्हणाल्या की, “खासदार सुनील तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे आणि माझ्या माध्यमातून म्हसळा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर विकासकामे करण्यात आली आहेत. ज्या विश्वासाने तुम्ही आम्हाला लोकसभा आणि विधानसभेत कौल दिला, त्याच विश्वासाने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना आशीर्वाद द्यावा. गावांच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही.”
या सदिच्छा भेटीवेळी सरकारी अधिकारी आणि पक्षाचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात प्रामुख्याने:
प्रशासन: निवासी नायब तहसीलदार चंद्रशेखर खोत, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर एडवळे. तालुका अध्यक्ष समीर बनकर, युवक अध्यक्ष फैसल गीते, माजी जि.प. सभापती बबन मनवे, छाया म्हात्रे, संदीप चाचले, मीना टिंगरे, अनिल बसवत, गजानन पाखड यांच्यासह विविध गावांचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावभेट संवाद बैठकीत महिला मंडळांनी आणि तरुणांनी मंत्री महोदयांचे उत्साहात स्वागत केले, तर ग्रामस्थांनी आपल्या भागात नवीन विकासकामे राबविण्याची विनंती त्यांना केली.

