सिद्धनाथ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, म्हसवड येथे निर्भया पथकाची भेट

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड | प्रतिनिधी

सिद्धनाथ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, म्हसवड येथे विद्यार्थ्यांमध्ये कायदेविषयक जागृती व मुलींच्या सुरक्षिततेबाबत जनजागरण करण्याच्या उद्देशाने निर्भया पथक क्रमांक ५ ने विशेष भेट दिली. ही भेट सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, दहिवडी उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत तसेच म्हसवड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी निर्भया पथक प्रमुख तानाजी चंदनशिवे, सहकारी सागर पोळ व राजश्री खाडे यांनी विद्यार्थ्यांना कायदेविषयक महत्त्वपूर्ण माहिती दिली. विशेषतः मुलींना गुड टच–बॅड टच या संकल्पनेची सविस्तर माहिती देत स्वतःचे संरक्षण कसे करावे, प्रसंग ओळखून योग्य निर्णय कसा घ्यावा, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

तसेच कोणत्याही प्रकारची अडचण, छेडछाड किंवा गैरवर्तनाची घटना घडल्यास त्वरित डायल 112 किंवा 1091 या हेल्पलाईनवर तक्रार नोंदवावी, असे स्पष्ट आवाहन निर्भया पथकाच्या वतीने करण्यात आले. अशा वेळी घाबरून न जाता विश्वासाने पोलीस यंत्रणेशी संपर्क साधण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक दासरे पी.यू., उपमुख्याध्यापक यादव पी.के. यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी निर्भया पथकाच्या उपक्रमाचे कौतुक करत अशा जनजागरण कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व सुरक्षिततेची जाणीव वाढते, अशी भावना व्यक्त केली.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *