कराड येथे नामदेव समाजोन्नती परिषदेची त्रैमासिक सभा संपन्न

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला

कराड :-प्रतिनिधी

कराड येथे रविवार दि ०४ जानेवारी २०२६ रोजी नामदेव समाजोन्नती परिषदेची त्रैमासिक सभा जिल्हाध्यक्ष इंजि. सुनील पोरे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. यावेळी कराड येथील नामदेव शिंपी समाज संस्थेच्या नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचा जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने शाल, पुष्प व हनुमान चालीसा पुस्तिका देऊन सन्मान करण्यात आला.

कराड शहराच्या वतीने जिल्हा कार्यकारिणीचे स्वागत व सत्कार समाज अध्यक्ष आकाश बाचल व त्यांच्या टीमने केला. सभेच्या प्रारंभी जिल्हाध्यक्ष इंजि. सुनील पोरे व सचिव श्रीकांत फुटाणे यांच्या हस्ते गणेश, संत शिरोमणी नामदेव महाराज व विठ्ठल-रुक्मिणी यांचे पूजन करण्यात आले.

यावेळी सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील प्रतिनिधींनी आपापल्या कार्याचा आढावा सादर केला. आगामी काळात समाज संघटन मजबूत करण्यासाठी नव्याने सभासद संख्या वाढविण्यावर विशेष भर देण्याचा ठराव करण्यात आला. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हातील नगरपरिषदेत समाजाचे बंधू भगिनीच्या नगरसेवक पदी निवडी बद्दल अभिनंदनाचा ठराव करण्यात आला तसेच दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी नागपूर येथे होणाऱ्या विश्व शिंपी समाज अधिवेशनास सातारा जिल्ह्यातील समाज बांधव-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ज्योतिराम कारंजकर यांनी केले, तर अहवाल वाचन सचिव श्रीकांत फुटाणे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अतुल बारटक्के व कविता अवसरे यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

या सभेस जयंत कांबळे (वडूज), संदीप धोंगडे (कोरेगाव), प्रमोद बेंद्रे, मनोज महाडीक (सातारा), डॉ. मकरंद पोरे, भास्कर चौगुले (वाई), अविनाश कारंजकर (मेढा), गजानन लंगडे (खंडाळा) विजयशेठ चाडवले(म्हसवड)प्रदीप पोरे (मायनी)किशोर हिरवे (मोरगिरी)निलेश कोकणे (दहिवडी)आदी प्रमुख मान्यवर सह जिल्ह्यातील बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *